दर्शन एक्स्प्रेसला यापूर्वी राज्यात मिरज, पुणे, लोणावळा, कल्याण आणि वसई रोड या ठिकाणी थांबे होते. आता रेल्वेनं घेतलेल्या नव्या निर्णयानुसार सांगली, कराड, सातारा आणि जेजुरीला या एक्स्प्रेसला थांबा मिळणार आहे. या निर्णयामुळं पश्चिम महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.
दर्शन एक्स्प्रेसचं वेळापत्रक कसं असेल?
दर्शन एक्स्प्रेस १२४९३ ही दर रविवारी मिरज स्थानकातून हजरत निजामुद्दीन स्थानकाकडे जाण्यासाटी सुटते. ही एक्स्प्रेस मिरजहून ही एक्स्प्रेस मिरजहून पहाटे ४.५० मिनिटांना सुटेल. त्यानंतर पहिला थांबा सांगली स्थानकात ५.०२ मिनिटांना असेल. सातारा जिल्ह्यात आल्यानंतर ही एक्स्प्रेस कराड स्थानकात ६.०२ मिनिटांना पोहोचेल. त्यानंतर सातारा रेल्वे स्थानकात ही गाडी ७.०७ मिनिटांना पोहोचेल. सातारा स्थानकातून सुटल्यानंतर जेजुरी स्थानकात ही गाडी ८.४३ वाजता असेल. सांगली, कराड आणि सातारा स्थानकात ही गाडी ३ मिनिटे थांबेल तर जेजुरी स्थानकावर या एक्स्प्रेसला २ मिनिटे थांबा असेल. त्यानंतर ही गाडी पुण्याकडे रवाना होईल.
दर्शन एक्स्प्रेस १२४९४ ही हजरत निजामुद्दीन रेल्वे स्थानकातून शुक्रवारी सुटते. त्या एक्स्प्रेसला देखील जेजरी, सातारा, कराड, सांगली हे थांबे देण्यात आले आहेत. शुक्रवारी दिल्लीहून सुटलेली एक्स्प्रेस राज्यात शनिवारी पोहोचते. जेजुरीला ही गाडी सायंकाळी ७ वाजून ४८ मिनिटांनी पोहोचले. साताऱ्यात रात्री ९ वाजून ४२ वाजता दर्शन एक्स्प्रेसला थांबा असेल. तर, कराडमध्ये ही गाडी १० वाजून ३७ मिनिटांनी पोहोचेल. तर, सांगली स्थानकात ११ वाजून ५२ मिनिटांनी दर्शन एक्स्प्रेस पोहोचेल.