• Mon. Nov 25th, 2024
    लग्नासाठी आयआरएस अधिकारी असल्याची बतावणी; नंतर हुंड्यासाठी छळ, पोलिसांंकडून करेक्ट कार्यक्रम

    नागपूर: एका भामट्या तरुणाने आई-वडिलांसह महिलेची फसवणूक करून आणि आधी खोटे बोलून तिचे लग्न लावून दिले. नंतर घरच्यांकडे हुंड्याची मागणी सुरू केली. आरोपी पतीला पोलिसांनी अटक केली आहे. विकी पांडुरंग उमरेडकर (३३, रा. कुराडपेठ, लष्करीबाग) असे अटक आरोपीचे नाव आहे. अन्य आरोपींमध्ये त्याचे वडील रामदास (७२) आणि आई आशा (६५) यांचा समावेश आहे. पाचपावली कॅम्पसमध्ये राहणाऱ्या २६ वर्षीय किरणच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
    हृदयद्रावक! प्रवाशांनी मदतीसाठी मारली हाक; आरपीएफ जवान ट्रेनमध्ये चढला, उतरताना घात झाला अन्…
    मिळालेल्या माहितीनुसार, विकीने एप्रिल २०२१ मध्ये किरण आणि त्याच्या कुटुंबियांची भेट घेतली. मग त्यांना सांगितले की, तो यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाला आहे. आयआरएस कॅडर आहे. ते केंद्रीय उत्पादन शुल्क आणि कस्टम विभागात सहाय्यक आयुक्त आहेत. आरोपींनी किरणला बनावट आय-कार्ड, पे स्लिप आणि बँक स्टेटमेंटही दाखवले होते. किरणचे कुटुंबीय त्याच्या जाळ्यात सापडले आणि काही महिन्यांनी त्यांचे लग्न झाले. विकीने सांगितले होते की, त्याची पोस्टिंग हरियाणामध्ये आहे. यानंतर विकी आणि तिच्या आई-वडिलांनी किरणसह तिच्या कुटुंबियांचा हुंड्यासाठी छळ सुरू केला.

    परदेशी भाज्या विक्री करणाऱ्या व्यापाऱ्याला नामांकित कंपनीनं घातला ७० लाखांना गंडा

    सोनसाखळी, बुलेट वाहन आणि रोख रकमेची मागणी सुरू केली. विकीने किरणच्या भावाकडूनही पैसे घेतले. विकी हा कोणत्याही विभागाचा अधिकारी नाही, हे माहीत असतानाही पालकांनी त्याला साथ दिली. हुंड्यासाठी शारीरिक आणि मानसिक छळ केला जात होता. त्यानंतर किरणने नाराज होऊन पोलिसात तक्रार केली. आरोपीला चौकशीसाठी पोलीस ठाण्यात बोलावले असता विकीने पोलिसांचीही दिशाभूल केली. तो स्वत:ला जीएसटी विभागातील अधिकारी सांगत होता. बनावट आयकार्डही दाखविण्यात आले. मात्र तपासणीत सर्व कागदपत्रे बोगस असल्याचे आढळून आले. पोलिसांनी विकी आणि त्याच्या पालकांविरुद्ध विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. विकीने अशाप्रकारे आणखी लोकांना गोवल्याचा पोलिसांना संशय असून त्याचाही तपास सुरू आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed