• Wed. Nov 27th, 2024

    राज्यात मूग, उडीद उत्पादन घटणार; मान्सून उशिरा आल्याने पेरणीचा हंगाम वाया

    राज्यात मूग, उडीद उत्पादन घटणार; मान्सून उशिरा आल्याने पेरणीचा हंगाम वाया

    Pune News : यंदाच्या हंगामात पावसाचे विलंबाने आगमन झाल्याने मूग आणि उडदाच्या उत्पादनात घट होण्याचा कयास आहे. तुरीची पेरणीही ८३ टक्क्यांइतकीच झाली आहे.

     

    राज्यात यंदा मूग, उडीद उत्पादन घटणार
    म. टा. प्रतिनिधी, पुणे : मान्सून उशिरा दाखल झाल्याने राज्यातील मूग व उडिदाच्या पेरणीला फटका बसला आहे. यंदाच्या खरीप हंगामात मूगाची पेरणी ४२ टक्के, तर उडदाची पेरणी ६२ टक्के क्षेत्रावर पूर्ण झाली असून, दोन्ही कडधान्यांचे उत्पादन घटण्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाकडून व्यक्त केला जात आहे. मान्सूनच्या पावसाने जून महिन्यात हजेरी न लावल्याने पेरणीचा बहुतांश हंगाम वाया गेला आहे.

    पुणे जिल्ह्यात खरीप हंगामातील पिकांचे सरासरी क्षेत्र एक लाख ९५ हजार ७१० हेक्टर आहे. यंदाच्या हंगामात पावसाचे विलंबाने आगमन झाल्याने मूग आणि उडदाच्या उत्पादनात घट होण्याचा कयास आहे. तुरीची पेरणीही ८३ टक्क्यांइतकीच झाली आहे. एकंदरीतच गेल्या वर्षीच्या तुलनेत कडधान्यांची पेरणी कमी झाली आहे. राज्यात मुगाचे सरासरी क्षेत्र ३ लाख ९३ हजार ९५७ हेक्टर असून, त्यापैकी ४२ टक्के म्हणजेच एक लाख ६४ हजार ७७४ हेक्टरवरील पेरणी पूर्ण झाली आहे.
    पावसाने आणले बळीराजाच्या डोळ्यांत पाणी; फुलंब्रीत हजारो हेक्टरवरील पिके धोक्यात
    राज्यातील उडदाचे सरासरी क्षेत्र ३ लाख ७० हजार २५२ हेक्टर आहे. त्यापैकी ६२ टक्के म्हणजे २ लाख २८ हजार ९१९ हेक्टरवरील पेरणी पूर्ण होऊ शकली. तुरीचे सरासरी क्षेत्र १२ लाख ९५ हजार ५१६ हेक्टर असून, प्रत्यक्षात ८३ टक्के म्हणजे १० लाख ८० हजार ७०९ हेक्टरवरील पेरणी पूर्ण झाली आहे. कुळीथ, चवळी, मटकी, राजमा आदी कडधान्ये पिकांखालील सरासरी क्षेत्र ७८ हजार ८४५ हेक्टर असून, प्रत्यक्षात ६८ टक्के म्हणजे ५३ हजार ९९६ हेक्टरवरील पेरणी पूर्ण झाल्याची माहिती कृषी विभागातर्फे देण्यात आली.

    टीम मटा ऑनलाइन यांच्याविषयी

    Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed