• Mon. Nov 25th, 2024

    शिवसेना चिन्हाचा निकाल, राष्ट्रवादीला निवडणूक आयोगाची आलेली नोटीस, शरद पवार म्हणाले…

    शिवसेना चिन्हाचा निकाल, राष्ट्रवादीला निवडणूक आयोगाची आलेली नोटीस, शरद पवार म्हणाले…

    छत्रपती संभाजीनगर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत विविध मुद्यांवर भाष्य केलं. इंडियाच्या बैठकीचं नियोजन, केंद्रातल्या भाजप सरकारकडून सुरु असलेलं कटुता वाढवण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप शरद पवार यांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष चिन्हासंदर्भात पत्रकारांनी विचारलं असता शरद पवारांनी शिवसेनेसंदर्भात निवडणूक आयोगानं घेतलेल्या निर्णयावर भाष्य केलं. याशिवाय त्यांनी आतापर्यंत १४ निवडणुका लढल्या असं सांगितलं. त्यामध्ये वेगवेगळ्या चिन्हांवर निवडणूक लढवूनही विजयी झालो, असं शरद पवार म्हणाले.

    शिवसेनेचं चिन्ह जाण्यामागचं राजकारण सांगत शरद पवार म्हणाले…

    केंद्रीय निवडणूक आयोगाने मला नोटीस दिली, चिन्हाबाबत उत्तर मागितले होते ते मी दिले आहे, असं शरद पवार म्हणाले. शिवसेनेचा निर्णय झाला त्यामध्ये केंद्र सरकार मधील शक्तिशाली घटकांचा हस्तक्षेप झाल्याचं दिसतं. ठाकरेंच्या शिवसेना फटका बसला,असं शरद पवार म्हणाले.
    पवारांचा एकेकाळचा गड, आता काँग्रेसचा डोळा; पृथ्वीराजबाबा माढा मतदारसंघासाठी आक्रमक
    शिवसेनेचा निर्णय झाला, त्यामध्ये काही शक्तिशाली हस्तक्षेप झाला. तसा प्रयोग आमच्यावर होण्याची शक्यता आहे. अजून झाला नाही. पण मला चिन्हाची चिंता नाही. मी १४ निवडणुका लढलो. त्यात अनेक चिन्ह मिळाली. त्यात मी विजयी झालो. मला चिन्हांची चिंता नाही. मात्र हा सत्तेचा गैरवापर आहे. राजकीय पक्षांना अडचणीत आणण्याचे धोरण आहे. आपल्याला यश मिळणार नाही असं दिसलं की अस केलं जातं, असं शरद पवार म्हणाले.

    राष्ट्रवादी हे कुटुंब, शरद पवारांनी सरकारसोबत यावं म्हणून भेटून साकडं घातलं,अजित पवार गटातील मंत्र्याची माहिती

    मी पुन्हा येईनवरुन दोन वेळा टोला

    शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर देवेंद्र फडणवीसांचा दाखला देत आजच्या पत्रकार परिषदेत दोनवेळा टोलेबाजी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात ईशान्य भारतासंदर्भात बोलण्याऐवजी मी पुन्हा येईन, असं म्हटलं. त्यांनी देवेंद्र फडणवीसांचं मार्गदर्शन घेतलं असावं, असं शरद पवार म्हणाले. पत्रकार परिषद संपवताना देखील शरद पवारांनी पुन्हा नरेंद्र मोदींना टोला लगावताना त्यांनी किती वेळा सांगितले मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन..त्यांची अवस्था फडणवीसांसारखी होईल, असं म्हटलं.

    Sharad Pawar: भाजपनं पाडलेल्या सरकारांची यादी वाचली, फडणवीसांचा दाखला देत मोदींना टोला, शरद पवारांचा हल्लाबोल

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *