त्र्यंबकेश्वर तालुक्यातील खैरायपाली ग्रामपंचायत अंतर्गत येणारा माचीपाडा येथील हा प्रकार असून काल उशिरा सरला ज्ञानेश्वर बाम्हणे या महिलेस प्रसूतिवेदना सुरु झाल्या. मात्र, गावात रस्ता नसल्याने जाण्यायेण्याचे साधनाही नव्हते, म्हणून घरीच प्रसूती झाली. तर आज सकाळी डोली करून बाळासह महिलेला दवाखान्यात आणण्यात आले.
आईला डोली करून तर पदरात गुंडाळून दवाखान्यापर्यंत न्यावे लागले. ठाणापाडा येथील आश्रमशाळेपर्यंत गावातील तरुणांनी डोली करून आणली. या ठिकाणी रस्त्यावर आणल्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्राची गाडी आली, या गाडीने काही अंतरावर दवाखान्यापर्यंत नेलं.
या ठिकाणी रस्त्यावर आणल्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्राची गाडी आली, या गाडीने काही अंतरावर दवाखान्यापर्यंत नेलं. मागच्या काही दिवसांपूर्वी देखील इगतपुरी तालुक्यात अशाच प्रकारच्या काही घटना घडल्या होत्या रस्ता नसल्याने शेतातून घेऊन जाणारी अंत्ययात्रा शेतकऱ्यांना रोखून ठेवली होती. तर, इगतपुरी तालुक्यातील गर्भवती महिलेला जवळपास दोन ते अडीच किलोमीटर झोळी करून दवाखान्यात नेण्यात आले होते.
त्यानंतर पुन्हा असाच प्रकार जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यात घडला. नवजात बालकाला आणि आईला दवाखान्यात दोन ते अडीच किलोमीटर झोळी करून घेण्यात आले.