• Mon. Nov 25th, 2024

    कॉलेजची वर्गमैत्रीण आणि आजींकडून बदनामी; आईकडून समजूत, अल्पवयीन विद्यार्थिनीने घेतला टोकाचा निर्णय

    कॉलेजची वर्गमैत्रीण आणि आजींकडून बदनामी; आईकडून समजूत, अल्पवयीन विद्यार्थिनीने घेतला टोकाचा निर्णय

    अकोला : अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील सौंदळा गावातील एका कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थीनीनं गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली . मुलीच्या आत्महत्या प्रकरणात तिचीच अल्पवयीन वर्गमैत्रीण आणि वर्गमैत्रीणीच्या दोन्ही आजींविरोधात हिवरखेड पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

    याप्रकरणी हिवरखेड पोलिसांनी वर्गमैत्रीणीसह दोन आजींविरुद्ध गुन्हा दाखल केलाय. दरम्यान, मुलगी महाविद्यालयातून सुट्टी घेऊन मुलाबरोबर पळून गेली, अशा प्रकारची बदनामी या तिघींनी केली होती. तेव्हापासून पीडित मुलगी तणावात होती, मुलीच्या आईने तिची समजूत काढण्याचा प्रयत्न केला मात्र, बदनामी पोटी अखेर तिनं आपलं जीवन संपवलं.

    काय आहे नेमकं प्रकरण?

    तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड पोलिस स्टेशन पोलीस निरीक्षक गोविंद पांडव यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिस स्टेशन हद्दीतील सोनवाडी येथील एका पित्यानं दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे की त्यांची १७ वर्षीय मुलगी सौंदळा येथील महाविद्यालयात शिक्षण घेत होती. आचल (बदलेलं नाव) ही दरोरज दोन मैत्रिणींसोबतच पायी कॉलेजला जायची. नेहमीप्रमाणे २८ जुलैला देखील त्यांची मुलगी मैत्रिणींसह कॉलेजला गेली. आचल हिची प्रकृती अचानक बिघडल्याने महाविद्यालयतील शिक्षकांनी घरी फोन करून माहिती दिली. त्यामुळे तिचा मावस मामा तिला घ्यायला गेला.

    काॅन्स्टेबलकडून ३ प्रवासी अन् एका पोलीसावर गोळीबार; जयपूर-मुंबई एक्सप्रेसमध्ये थरकाप उडवणारी घटना

    मामाच्या दुचाकीवर बसून मुलगी घरी आली. त्यावेळी आचलसोबत महाविद्यालयात शिकणाऱ्या व गावातील एका मैत्रिणीने तिची कॉलेजमध्ये बदनामी केली. आचल महाविद्यालयातून सुटी घेऊन कुणातरी मुलाबरोबर पळून गेली, अशा प्रकारची बदनामी तिने करायला सुरुवात केली. बदनामी सहन होत नसल्यामुळे पिडीत मुलीने तिच्या वर्ग मैत्रिणीची समजूतही काढली. परंतु गैरसमज वाढत गेल्यानं ‘त्या’ वर्ग मैत्रिणीनं व तिच्या दोन्ही आजींनी आचल हिला मारहाण केली, असंही तिच्या वडिलांनी तक्रारीत नमुद केले होते.

    दरम्यान, आचलच्या आईनं तिची समजूत काढली अन् १ ऑगस्ट रोजी शेतात निघून गेली. त्यानंतर सायंकाळी घरी परतल्यानंतर आचल ही घरात गळफास लावलेल्या अवस्थेत दिसून आली. आचलच्या मैत्रीण व मैत्रिणीच्या आजी या तिघींनी आमच्या मुलीची बदनामी केली, या बदनामीपोटी आचलनं आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला होता.

    तक्रारीनंतर हिवरखेड पोलिसांनी मृत आचल हिच्या आई-वडिलांसह मावस मामा, काका आणि शिक्षकांचा जबाब नोंदविल्यानंतर या आत्महत्या प्रकरणाचा तपास केला. तपासादरम्यान गावातील अल्पवयीन मुलगी व तिची आजी दुर्गा सपकाळ, विमल परघरमोर यांनी मुलीची बदनामी केल्यानं आचल हिने आत्महत्या केल्याचं चौकशीतून समोर आले. त्यामुळ पोलिसांनी याप्रकरणात अल्पवयीन मुलीसह तिच्या दोन्ही आजींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

    भाविकांनो काळजी घ्या; अधिक मासाच्या गर्दीचा फायदा, तुळजाभवानी मंदिरात भक्तांचे खिसे कापले

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *