• Thu. Mar 12th, 2026

    धक्कादायक! हल्लेखोराने चालत्या ट्रेनमधून तरुणीला फेकले, दादर रेल्वे स्थानकातील घटना

    धक्कादायक! हल्लेखोराने चालत्या ट्रेनमधून तरुणीला फेकले, दादर रेल्वे स्थानकातील घटना

    मुंबई : मुंबईत धक्कादायक घटना घडली आहे. मध्य रेल्वेच्या दादर स्थानकावर चालत्या ट्रेनमधून एका तरुणीला एका हल्लेखोराने बाहेर फेकून दिले. पु्ण्याहून मुंबईकडे येणाऱ्या उद्यान एक्स्प्रेसमधल्या महिलांच्या डब्यात ही भयंकर घटना घडली. सुदैवाने यात ही तरुणी बचावली. या घटनेनंतर पुन्हा एकदा रेल्वेतून प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

    काल रात्री ८.३० वाजता ही घटना घडली. प्रथम या २९ वर्षीय तरुणीवर एका हल्लेखोराने हल्ला केला. या तरुणीने या हल्लेखोराला प्रतिकार केल्यानंतर त्याने ट्रेनमधून या तरुणीला फेकून दिले.

    भारत बनला जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था, चीनने अमेरिकेला मागे टाकले, जपान-रशिया आपल्या मागे
    या घटनेबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, दादर स्टेशनच्या प्लॅटफॅार्मवर गाडी आल्यानंतर जनरल लेडीज डब्यातील सर्व महिला उतरल्यानंतर संबंधित तरूणी एकटीच डब्यात असल्याचे पाहून हल्लेखोर डब्यात चढला. यावेळी तरूणीने त्याला प्रतिकार केला. झटापटीत हल्लेखोराने चालत्या ट्रेनमधून फेकून दिले. सुदैवाने ती प्लॅटफॅार्मवर पडल्याने पडली आणि जखमी होवून बेशुद्ध पडली.

    घरवापसी! अविनाश घोगरे यांचा पुन्हा मनसेत प्रवेश, पक्षाला शिरूर शहरात उभारी मिळणार
    पोलिसांनी हल्लेखोराला सीएसटीवरून तपास करून अटक केली असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

    पोलीस विभाग, प्रशासन हादरले; पीडित महिलेने पोलीस स्टेशनमध्ये घेतले विष, पोलीस निरीक्षकावर कारवाईची केली मागणी

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed