• Mon. Sep 14th, 2026

Baramati Crime News : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. याचदरम्यान, बारामतीमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका 19 वर्षीय तरुणाने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केलीय.

महिलेसोबत प्रेमसंबंध पतीला समजले तरुणाची आत्महत्या(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
दीपक पडकर, पुणे (बारामती) : प्रेमसंबंधाच्या कारणावरून तणावात आलेल्या 19 वर्षीय तरुणाने स्वतःवर गोळी झाडून घेतल्याची घटना बारामती शहरातील सूर्यनगरी परिसरात घडली. गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा पुणे येथील ससून रुग्णालयात उपचार सुरू असताना आज रविवारी सकाळी मृत्यू झाला. आविष्कार अमोल ढोले (वय 19, मूळ रा. कुरवली, ता. पंढरपूर, जि. सोलापूर) असं मृत तरुणाचं नाव आहे.

प्रेमसंबंधाची माहिती समजल्यामुळे तणावात

बारामती शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आविष्कार ढोले हा बारामतीतील सूर्यनगरी परिसरातील जयश्री अपार्टमेंटमध्ये राहत होता. त्याचे गावातील एका महिलेसोबत प्रेमसंबंध होते. या संबंधाची माहिती महिलेच्या पतीला समजल्यानंतर तो तणावात होता. काल शनिवारी दुपारी साडेतीन ते पावणेचारच्या दरम्यान त्याने राहत्या खोलीत स्वतःकडील पिस्तूलातून डोक्यात गोळी झाडून घेतली. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या ढोले याला उपचारासाठी प्रथम बारामती येथील वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आलं.

Maharashtra TimesManoj Jarange Patil: मनोज जरांगेंना धक्का; मुंबई पोलिसांनी आंदोलनाला परवानगी नाकारली, मागील उपोषणाचा दाखला, कोणकोणती कारणे दिली?

कोणताही संशय नसल्याची माहिती समोर

त्यानंतर पुढील उपचारासाठी पुणे येथील ससून रुग्णालयात हलविण्यात आलं. मात्र, उपचार सुरू असताना आज रविवारी सकाळी सहाच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी सुजित रवी घोडके यांनी बारामती तालुका पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. या घटनेत कोणताही संशय नसल्याचं खबर देणाऱ्यानं पोलिसांना सांगितलं आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल कदम करीत आहेत.

अज्ञाताने विवाहितेला घरात घुसून संपवलं

बारामती तालुक्यातील पणदरे येथे घरातील झोपण्याच्या खोलीत विवाहितेच्या डोक्यात व चेहऱ्यावर अज्ञात हत्यारानं मारहाण करून, तसेच टॉवेलने गळा आवळून खून केल्याची घटना काल शनिवारी सायंकाळी उघडकीस आली. वैशाली तानाजी पवार (वय 30, रा. पणदरे) असं हत्या झालेल्या विवाहितेचं नाव आहे. या प्रकरणी मयत महिलेची सासू रंजना लक्ष्मण पवार (वय 50, रा. खडकआळी, पणदरे) यांनी माळेगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा