मुंबई : मुंबईतील वांद्रे येथील एका ज्वेलरी स्टोअरमध्ये एक तरुण रेनकाट घालून हातात बंदूक घेऊन घुसला. त्या तरुणाचं वय २९ वर्षांच्या दरम्यान होतं. त्यानं ज्वेलरी शॉपमध्ये घुसताच धमकी द्यायला सुरुवात केली. त्यानं दागिने आणि रोख रक्कम मागण्यास सुरुवात केली त्यासाठी तो बंदूक दाखवत होता. त्यानंतर त्यानं मालकाला धमकी देत ५ लाखांची मागणी केली ते न दिल्यास गोळीबार करण्याचा इशारा दिला. मात्र, ज्वेलरी शॉपमध्ये काम करणाऱ्या एका तरुणीच्या सतर्कतेमुळं त्यानं तिथून पळ काढला. मात्र, तो तरुण काही वेळातच क्राइम ब्रांच यूनिट ९ चे पोलीस अधिकारी दया नायक यांच्या हाती लागला.
क्राइम ब्रांचच्या यूनिट ९ चे पोलीस अधिकारी दया नायक यांच्या टीमनं त्या युवकाला वांद्रे स्टेशन परिसरातून अटक केली. अटक केलेल्या तरुणाचं ना रियाझ गणी वार असं असून तो काश्मीरच्या कुपवाडा येथील असल्याचं समोर आलं आहे. पोलिसांनी त्याचा पासपोर्ट आणि आधार कार्ड जप्त करुन चौकशी सुरु केली आहे. क्राइम ब्रँचच्या अधिकाऱ्यांनी त्याच्या संदर्भातील माहिती काश्मीर पोलिसांकडे पाठवली आहे.

पोलिसांनी रियाझ गणी वार याच्याकडे बंदूक कशी आली याची चौकशी सुरु केली आहे. रियाझनं बंदुकीच्या जोरावर ज्लेवरी शॉपमधील तरुणीला धमकी देत दागिने आणि रोख रक्कम देण्यास सांगितलं. त्याचवेळी दुसऱ्या तरुणीनं बंदुकीच्या भीतीनं दुकानातील अलार्मिंग सिस्टीमचं बटन दाबलं. त्यानंतर तिथून पळ काढला आणि ज्वेलरी स्टोअरच्या मालकाला धमकी देत ५ लाख रुपयांची खंडणी मागू लागला होता, असं दया नायक म्हणाले.