जिल्हा पोलीस तपास यंत्रणा सगळ्या बाजूने तपास करत आहेत त्यामुळे अधिकृत अंतिम निष्कर्षापर्यंत पोलीस तपास यंत्रणा कधी पोहोचतील हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. याच विषयावरून जिल्हाभरातून विविध सामाजिक संस्थांकडून याप्रकरणी संताप व्यक्त केला जात आहे. नीलिमा चव्हाण मृत्यू प्रकरण पावसाळी अधिवेशनातही आमदार भास्कर जाधव यांनी मांडल होत, चिपळूणचे आमदार शेखर निकम यांनीही या प्रकरणात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे चौकशीची मागणी केली होती. या सगळ्या प्रकरणात पोलिस यंत्रणा युद्धपातळीवर तपास करत आहेत.
या सगळ्याप्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड पोलीस उपविभागीय अधिकारी श्री. मुणगेकर, दापोलीचे पोलीस निरीक्षक श्री.अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस यंत्रणांच्या एकूण आठ टीम तयार करण्यात आल्या आहेत.जिल्हाभरात या प्रकरणाचा कसून तपास सुरू आहे. आजपर्यत जवळपास १०० पेक्षा अधिक व्यक्तिची पोलिसांनी चौकशी करण्यात आली आहे
नीलिमा हिचे शेवटचे मोबाईलचे लोकेशन हे खेड येथील येत होते हे लोकेशन खेड भोस्तेजवळ आहे. याच परीसरात उतरून तिने मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील जुना भरणे येथील वाहतुकीसाठी बंद असलेला पूल आहे याच पुलाच्या दिशेने ती चालत गेल्याची माहिती तपासात समोर आली आहे. पोलीस तपास यंत्रणा याबाबत अजूनही याप्रकरणी युद्धपातळीवर तपास करत आहेत. खेड जगबुडी नदीत दोन बोटी व पन्नास ते साठ कर्मचारी निलिमाची बॅग व मोबाईल याचा शोध घेत आहेत. या दोन वस्तू पोलिसांच्या हाती लागल्यास नीलिमा चव्हाण मृत्यू प्रकरणात मोठा उलगडा होऊ शकतो. निलिमाची घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत बेताची आहे. स्टेट बँकेच्या दापोली शाखेत ती कंत्राटी कर्मचारी म्हणून काम करत होती. नीलिमा चव्हाण हिची मानसिक स्थितीही त्यादिवशी कशी होती याचाही अंदाज या तपासात लावला जात आहे.
दरम्यान, बेपत्ता होण्यापूर्वी नीलिमा आपल्या एका मैत्रिणीला भेटली होती. या दोघींची भेट अनेक वर्षांनी झाली होती. वास्तविक नीलिमा हिला मैत्रीण भेटल्याचा आनंद होणे अपेक्षित होते. मात्र, तिच्या चेहऱ्यावर कोणतेच तसे भाव दिसले नाहीत, असेही एक निरीक्षण या चौकशी दरम्यान तिच्या मैत्रिणीकडून तपासात समोर आले आहे. या सगळ्या प्रकरणाचा तपास अद्याप सुरू आहे. निलिमा चव्हाण हिच्या घरच्यांकडून याप्रकरणी पोलिसांच्या भूमिकेवरच आक्षेप घेण्यात आला आहे.