• Sat. Sep 21st, 2024

व्यंजनाची लज्जत वाढवणारी कोथिंबीर मातीमोल; एका मोठ्या जुडीसाठी काय आहेत सध्याचे दर?

व्यंजनाची लज्जत वाढवणारी कोथिंबीर मातीमोल; एका मोठ्या जुडीसाठी काय आहेत सध्याचे दर?

म. टा. प्रतिनिधी, नाशिक : महिनाभरापूर्वी शंभरी पार केलेल्या कोथिंबिरीने सर्वसामान्यांचे आर्थिक बजेट कोलमडले होते. मात्र, गेल्या आठवड्यापासून कोथिंबिरीच्या दरात मोठी घसरण सुरू आहे. शनिवारी (दि. ५) बाजार समितीत मोठ्या जुडीसाठी अवघा दोन ते पाच रुपयांचा दर मिळाला. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना दिलासा मिळाला असला तरी शेतकऱ्यांचा मात्र उत्पादन खर्चही निघेनासा झाला आहे.

सुरूवातीच्या काळात पावसाने ओढ दिल्याने पालेभाज्यांची आवक प्रचंड कमी होती. त्यामुळे दरांतही वाढ झाली होती. मात्र, आता पावसामुळे पालेभाज्या मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत आहेत. अशातच पावसाळ्यात पालेभाज्या लवकर खराब होत असल्याने किरकोळ भाजी विक्रेत्यांसह ग्राहकांकडूनही काही प्रमाणात खरेदी कमी झाली आहे. याचा परिणाम पालेभाज्यांच्या दरांवर झाला असून, कोथिंबिरसह शेपू, पालक आणि मेथी जुडीचे दर प्रचंड घसरले आहेत. महिनाभरापूर्वी बाजार समितीत कोथिंबिरची मोठी जुडी १२० रुपयांपर्यंत पोहोचली होती. आता हेच दर २ ते ५ रुपयांवर येऊन ठेपले आहेत. याचबरोबर ५० ते ६० रुपयांवर गेलेली मेथीची मोठी जुडी आता ५ ते २५ रुपयांना उपलब्ध आहे. बाजार समितीत पालेभाज्या स्वस्त झाल्या असल्या तरीही फळभाज्यांच्या दरांत प्रचंड वाढ झाली आहे.
सर्वसामान्यांना मसाल्यांचा ठसका! विलायची, सुंठासह काळे मिरेही परवडेना; कितीने वाढले भाव जाणून घ्या
बाजार समितीतील पालेभाज्यांचे दर (मोठी जुडी)
भाजी महिनाभरापूर्वीचे दर शनिवारचे दर

मेथी ५० ते ६० ५ ते २५ (मोठी जुडी)
शेपू ३५ ते ४० ४ ते २० (मोठी जुडी)
पालक २० ४ ते ८ (मोठी जुडी)
कोथिंबीर १२० २ ते ५ (मोठी जुडी)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed