• Thu. Mar 12th, 2026
    Jalgaon Farmer: केळी पीकविम्यात घोटाळा; जळगाव जिल्ह्यातील 27 हजारांवर शेतकऱ्यांना नोटिसा, प्रकरण काय?

    Jalgaon Banana Crop Insurance Scam: जळगावातील सात तालुक्यांमध्ये हा प्रकार समोर आला आहे. यात चोपडा तालुक्यातून सर्वाधिक बोगस विमा काढण्यात आला आहे.

    केळी पीकविम्यात घोटाळा(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    म. टा. प्रतिनिधी, जळगाव: जळगाव जिल्ह्यात केळीची लागवड नसताना ४४ हजार हेक्टरवर लागवड दाखवून केळीचा फळ पीक विमा योजनेतंर्गत विमा काढल्याचे ‘एमआरसॅक’द्वारे करण्यात आलेल्या ‘सॅटेलाइट’ पडताळणीत निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी प्रशासनाने आता कारवाईचा बडगा उगारला आहे. संशयाच्या फेऱ्यात सापडलेल्या ५५ हजारावर शेतकऱ्यांना खुलासा करण्यासाठी मोबाइलवर नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत. ज्या सीएससी केंद्रांवर बोगस फॉर्म भरले गेल, अशा ४८ केंद्रचालकांवर गुन्हा दाखल करण्याची तयारीदेखील करण्यात आली आहे.

    जळगाव जिल्ह्यात १ नोव्हेंबर ते १५ डिसेंबरदरम्यान एमआरसॅकद्वारे करण्यात आलेल्या तांत्रिक पडताळणीत २८ हजार ४७५ हेक्टर क्षेत्रावर प्रत्यक्षात केळीची लागवडच नव्हती. तरीही २७ हजार ४१९ शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी लागवड असल्याचे भासवून विमा काढल्याचे समोर आले. उर्वरित १७ हजार हेक्टरवर एकाच गटात चार ते पाच शेतकऱ्यांनी विमा काढल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणातही २९ हजार शेतकरी संशयाच्या फेऱ्यात सापडले आहेत.

    Maharashtra TimesEknath Khadse: एकनाथ खडसे अडचणीत! मुक्ताईनगर जमीन व्यवहारप्रकरण अंगलट, महसूलमंत्र्यांचे थेट SIT चौकशीचे आदेश
    ३७ कोटींची रक्कम जप्त
    बोगस केळी पीक विम्याचा हा प्रकार समोर आला नसता, तर शासनाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले असते. दरम्यान, कृषी आयुक्तालयाकडून हा अहवाल प्राप्त झाल्यानंतर आता या संशयित ५५ हजार शेतकऱ्यांना नोटिसा बजावत सात दिवसांत खुलासा करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. तसेच शेतकऱ्यांनी भरलेली ३७ कोटी रुपयांची विम्याची रक्कम राज्य शासनाने जप्त केली आहे. ज्या ४८ सीएससी केंद्रांमध्ये हे बोगस फॉर्म भरून दिले आहेत, त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची तयारी प्रशासनाने सुरू केल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली आहे.
    Maharashtra TimesJalgaon News : ‘निलेशचा मोबाईल बंद आहे, त्याला उठवा’; चुलत भावाने दरवाजा उघडताच भयंकर दृश्य, पोलीस कर्मचाऱ्याने आयुष्य संपवलं
    चोपडा तालुक्यात सर्वाधिक बोगस विमा
    ७ हजार २४३ शेतकऱ्यांनी शेतात केळी नसतानाही विमा काढल्याचे उघड झाले आहे. या ठिकाणी ८ हजार ४१९ हेक्टरवर केळी नसताना केळी पीक दाखवले आहे. त्या खालोखाल यावल तालुक्यात ५ हजार ३६८ शेतकऱ्यांनी बोगस विमा काढला आहे. त्यापाठोपाठ रावेर, जळगाव, धरणगाव, मुक्ताईनगर व जामनेर तालुक्याचा समावेश आहे.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये ३ वर्षांपासून कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहे.या आधी सकाळ मिडियामध्ये २ वर्ष कामाचा अनुभव आहे. चालू घडामोडी, गुन्हेगारी, राजकीय विषयांच्या बातम्यांत विशेष आवड.… आणखी वाचा