• Sat. Sep 21st, 2024

संभाजीनगरात पाण्याचा पुन्हा खेळखंडोबा; उद्या ५ तास पाणीपुरवठा बंद, कोणत्या भागाला फटका?

संभाजीनगरात पाण्याचा पुन्हा खेळखंडोबा; उद्या ५ तास पाणीपुरवठा बंद, कोणत्या भागाला फटका?

म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : देखभाल-दुरुस्तीच्या कामासाठी शुक्रवारी (चार ऑगस्ट) सकाळी अकरा ते दुपारी चार वाजेपर्यंत पाणीपुरवठा यंत्रणा पूर्णपणे बंद ठेवण्यचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. या काळात जायकवाडी धरणातून केली जाणारी पाण्याची उचल पूर्णत: बंद राहणार असल्यामुळे शहराचा पाणीपुरवठा विस्कळित होणार आहे. शहरात बहुतेक ठिकाणी पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक एक दिवसाने पुढे ढकलले जाण्याची शक्यता आहे.

याबद्दल पालिकेकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, पाणीपुरवठ्याच्या १०० दशलक्ष लिटर योजनेवरील नवीन जायकवाडी पंपगृह येथे व्हीसीबी पॅनल बसवणे, पंप क्रमांक चारमध्ये व्हॉल्व्ह बदलणे व इतर अनुशंगिक कामे केली जाणार आहेत. त्यासाठी शुक्रवारी (चार ऑगस्ट) सकाळी अकरा ते दुपारी चार वाजेपर्यंत एकूण पाच तासांसाठी खंडन काळ घेण्यात आला आहे. ५६ दशलक्ष लिटर योजनेवरील जुन्या जायकवाडी पंपगृहास वीजपुरवठा करणाऱ्या ३३ केव्ही मुख्य फिडरवर महावितरण कंपनीतर्फे जोडणीचे काम केले जाणार आहे.

मी शिर्डीला गेल्यामुळे कोल्हापुरात पूर आला नाही, केसरकरांकडून दैवी शक्तीचा दावा

यासाठी सकाळी अकरा ते साडेअकरा आणि दुपारी तीन ते चार वाजेपर्यंत एकूण एक तास ३० मिनिटे खंडन काळ घेण्यात येणार आहे. दोन्हीही योजनेच्या खंडणकाळाच्या दरम्यान जायकवाडी धरणातून पाण्याची उचल पूर्णपणे बंद राहणार आहे. त्यामुळे शहराचा पाणी पुरवठा विस्कळीत होईल, नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed