• Sat. Sep 21st, 2024

सैन्यदलासह पोलिसात भरती होण्याचं स्वप्न,एका घटनेनं तरुणाचं टोकाचं पाऊल, काय घडलं?

सैन्यदलासह पोलिसात भरती होण्याचं स्वप्न,एका घटनेनं तरुणाचं टोकाचं पाऊल, काय घडलं?

ठाणे : भारतीय सैन्य दलात आणि पोलीस मध्ये भरती होण्याची स्वप्न बघणाऱ्या एका तरुणाने ड्रिंक एन्ड ड्राइव्हची केस लागल्यामुळे करियर संपलं या नैराश्यातून जीवन संपवल्याची धक्कादायक घटना ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरात घडली आहे. या घटनेनंतर परिसरात एकाच खळबळ उडाली आहे. मनीष उतेकर या तरुणाने टोकाचं पाऊल उचलण्यापूर्वी एक नोट लिहून आपल्या आईला पाठवली होती. या नोटमध्ये म्हणजेच मेसेजमध्ये मनीषने काही वाहतूक पोलिसांची नाव लिहलेली आहेत. या प्रकरणी अद्याप कुठलाही गुन्हा दाखल झालेला नसून पुढील तपास पोलीस करत आहेत.

मनीष उतेकर हा तरुण ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरात राहणार आहे. तसेच तो आर्मी भरती पोलीस भरतीसाठी परीक्षा देत होता. भारतीय सैन्यदल आणि पोलीस दलामध्ये भरती होणाची स्वप्न बघणाऱ्या या मनीषने जीवन संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. त्यानं टोकाचा निर्णय घेण्यापूर्वी आपल्या आईच्या मोबाईलवर एक नोट पाठवली.

Shirdi: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंना शिर्डीच्या साईप्रसादालयातील जेवण आवडलं, आचाऱ्यांना धाडलं दिल्लीचं निमंत्रण

यामध्ये मनीषने सांगितले आहे की, गटारीच्या दिवशी त्याने आणि त्याच्या मित्राने मद्यपान केले होते. मद्यपान करून वाहन चालवत असताना त्याला वाहतूक पोलिसांनी ठाणे पूर्वेतील कोपरी परिसरात अडवले आणि त्याच्या विरोधात ड्रिंक अँड ड्राइव्हचा गुन्हा दाखल करुन कोर्टात जाण्यास सांगितले. मात्र दोन दिवस पोलिसांची माफी मागून दंड भरतो असे सांगितले तरी त्यांनी करियर बरबाद करणार असल्याची धमकी दिली असल्याचा आरोप मनीषने नोट मध्ये केला आहे. मात्र कोर्टात गेलो तर आपलं करियर संपून जाईल या नैराश्यातून मनीष उतेकर याने आपल्या राहत्या घरात आईच्या साडीच्या साहाय्याने जीवन संपवलं आहे.

मोठी बातमी: डॉ. दत्ता सामंत हत्याप्रकरणात गँगस्टर छोटा राजनची निर्दोष मुक्तता

या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मनीषने काही पोलीस कर्मचाऱ्यांची नाव लिहलेली असून त्यांनी करियर संपवण्याची धमकी दिल्याचा उल्लेख केला आहे. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास करावा अशी मागणी मनीषच्या कुटुंबीयांनी आणि मित्रमंडळींनी केली आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यात रात्री उशिरा पर्यंत कुठल्याही प्रकारचा गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. मात्र या प्रकरणी पोलीस चौकशी सुरु असून चौकशी नंतर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होणार असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.

मुंबईत इंडिया आघाडीची बैठक कधी होणार? शरद पवारांच्या भेटीनंतर नाना पटोलेंकडून मोठी अपडेट, म्हणाले…
दरम्यान, ठाणे पोलीस दलातील अधिकाऱ्यांनी या प्रकरणी कायदेशीर रित्या योग्य कारवाई करण्यात आली होती. मद्यपान करुन वाहन चालवण्याच्या केसेस कोर्टाकडे जातात. त्यामध्ये दंड घेऊन सोडून देता येत नाही. त्यामुळं पोलिसांनी केलेली कारवाई योग्य असल्याचं म्हटलं. याशिवाय सैन्यदल आणि पोलीस भरतीत जायची इच्छा असणाऱ्या तरुणांनी अशी कृत्य करु नयेत, असं देखील ते म्हणाले. घडलेली घटना दुर्दैवी आहे, असं देखील ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed