• Sat. Sep 21st, 2024
सलाम..! नागपूरच्या डॉक्टरांनी करुन दाखवलं; भूल न देता ब्रेन ट्युमरची शस्त्रक्रिया यशस्वी, इतिहास रचला

नागपूर: शहरातील सुपर स्पेशालिटी रुग्णालयातील मेंदूविकार उपचार विभागात डॉक्टरांनी शस्त्रक्रियेदरम्यान रुग्णाला जागृत ठेवून रुग्णांच्या मेंदूतील ‘ट्यूमर’ (गाठ) यशस्वीरित्या काढण्यात यश आले आहे. त्यामुळे ट्यूमरच्या दोन रुग्णांना जीवदान मिळाले असून रुग्णांनाही रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. मिथिलेश गौतम, (२०) आणि रेखा झांजाळ (३०) या दोन रुग्णांवर शस्त्रक्रिया करून त्यांना शुद्धीवर ठेवून मेंदूतील गाठी काढून टाकण्यात आल्या.
Shirdi: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंना शिर्डीच्या साईप्रसादालयातील जेवण आवडलं, आचाऱ्यांना धाडलं दिल्लीचं निमंत्रण
मिळालेल्या माहितीनुसार, नागपुरातील मिथिलेश आणि मध्य प्रदेशातील रेखा यांना डोकेदुखीचा त्रास होत होता. कुटुंबियांनी त्यांना खासगी रुग्णालयात तपासणीसाठी नेले. खाजगी रुग्णालयात उपचार किफायतशीर नसल्याने अखेर त्यांना सुपर स्पेशालिटीमध्ये आणण्यात आले. ब्रेन ट्यूमरमुळे दोन्ही रुग्णांना बरोबर बोलता येत नव्हते. दोन्ही रुग्णांना ब्रेन ट्यूमर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. ही एक धोकादायक शस्त्रक्रिया होती. दुखापत झाली असती तर दोघांची बोलण्याची क्षमताही गेली असती. केवळ शस्त्रक्रियेसाठी आवश्यक क्षेत्र बधिर करण्यात आली. या रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आली. याला वैद्यकीय भाषेत ‘अवेक क्रॅनिओटॉमी’ म्हणतात.

मेंदूची शस्त्रक्रिया करते वेळी रुग्ण घाबरलेले असतात. हा ट्युमर ज्या ठिकाणी होता त्या ठिकाणाहून बोलणे किंवा वाचा ही कंट्रोल होत असते. त्यामुळे हे ऑपरेशन रुग्णांना बधीर न करता जागृत अवस्थेत करण्याचा निर्णय डॉक्टरांकडून करण्यात आला. ऑपरेशन वेळी रुग्ण घाबरु नये म्हणुन ऑपरेशनच्या आधी रुग्णांचे समुपदेश करण्यात आले. शस्त्रक्रियेच्या वेळी रुग्णाला पुर्ण बधीर न करता फक्त डोक्यातील नसांना बधीर करुन शस्त्रक्रिया करण्यात आली. रुग्णाला वेदना होऊ नये, म्हणुन डॉक्टरांनी सलाईनद्वारे वेदनादायी औषध सुरू ठेवले जात होते. ट्युमर काढताना रुग्णांशी बोलणे सुरू होते. ज्यामुळे ट्युमर निघेल.

आई-वडील शिक्षक, कला असो वा अभ्यास चिमुकली अव्वल; शिष्यवृत्तीत प्रथम येत लेकीचा सातारमध्ये डंका

आजूबाजच्या महत्त्वाचा भाग आसलेल्या बोलण्याची शक्ती ती जशीचा तशी राहील याची काळजी घेण्यात आली. त्यामुळे दोन्ही रुग्ण पुर्णपणे बरे होऊन सुखरूपपणे त्यांचा घरी जाऊ शकले. त्यांचा ट्युमर निघालेला आहे. तसेच त्यांची वाचा आणि बोलणे व्यवस्थित आहे. प्रमोद गिरी यांच्या नेतृत्वाखाली न्यूरो सर्जन डॉ. संजोग गजभिये, सहयोगी प्राध्यापक डॉ. श्रीकांत कलबगवार, न्यूरो ऍनेस्थेटिस्ट डॉ. शिल्पा जैस्वाल, डॉ. पंकज भोपळे, डॉ. मंगेश मुळावकर, डॉ. कमलेश रंगारी, डॉ. पियुष ठोंबरे यांच्या वैद्यकीय पथकाने ब्रेन ट्यूमर ‘अवेक क्रॅनिओटॉमी’ शस्त्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed