• Sat. Sep 21st, 2024

Nashik: शहरातील ‘Zone-2’च्या उपायुक्तांची उचलबांगडी; सहाय्यक आयुक्तांनाही हटविले, कुणाची नियुक्ती?

Nashik: शहरातील ‘Zone-2’च्या उपायुक्तांची उचलबांगडी; सहाय्यक आयुक्तांनाही हटविले, कुणाची नियुक्ती?

म. टा. प्रतिनिधी, नाशिक : शहर पोलिस आयुक्तालयातील परिमंडळ दोनचे (झोन-२) उपायुक्त चंद्रकांत खांडवी आणि नाशिकरोडचे सहायक आयुक्त अंबादास भुसारे यांची पोलिस आयुक्तांनी तडकाफडकी बदली केली आहे. त्यानंतर झोन-२च्या उपायुक्तपदी मोनिका राऊत आणि नाशिकरोडच्या सहायक आयुक्तपदी आनंदा वाघ यांना नियुक्त केले आहे. काही दिवसांत परिमंडळ दोनमध्ये वाढलेल्या गुन्हेगारीमुळे हे बदल झाल्याची आयुक्तालयात चर्चा आहे.

शहर आयुक्तालयाच्या परिमंडळ दोनमध्ये सातपूर, अंबड, इंदिरानगर, उपनगर, नाशिकरोड आणि देवळाली कॅम्प ही पोलिस ठाणी आहेत. काही दिवसांपासून अंबडमध्ये सशस्त्र हल्ले, उपनगरांतील खून, जाळपोळ, नाशिकरोड हद्दीत एटीएम चोरी व दरोड्याचे गुन्हे घडले आहेत. या गुन्ह्यांची उकल अपेक्षेप्रमाणे होत नसून, अधिकाऱ्यांचा वचकही कमी झाल्याचे वास्तव आहे. त्यातूनच पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी आठ दिवसांपूर्वी नाशिकरोड पोलिस ठाण्याच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या सर्वांना दंगल नियंत्रण पथकात नेमले. त्यानंतर आता थेट पोलिस उपायुक्त आणि सहायक आयुक्तांची बदली करण्यात आली आहे. पोलिस आयुक्तांच्या या निर्णयामुळे आता अंमलदारांपाठोपाठ वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या वर्तुळातही धाबे दणाणले आहे. या खात्यांतर्गत बदलांमागे प्रशासकीय कारण असल्याचा दावा आयुक्तालयाने केला आहे. परंतु, गुन्ह्यांची उकल होत नसून, गुन्हेगारी वाढतच असल्यामुळे हे बदल झाल्याची चर्चा आयुक्तालयातील अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांमध्ये आहे. या बदलांमुळे गुन्हेगारी नियंत्रणात यावी, अशी नागरिकांची अपेक्षा आहे.
Nashik News: सिनेस्टाईल पाठलाग करुन भररस्त्यात तरुणाला संपवलं; २ संशयितांसह विधिसंघर्षित मुलाला अटक
नवीन नियुक्त्या

उपायुक्त मोनिका राऊत : मुख्यालयातून परिमंडळ-२
उपायुक्त चंद्रकांत खांडवी : परिमंडळ-२ मधून मुख्यालय व वाहतूक
सहाय्यक आयुक्त आनंदा वाघ : विशेष शाखेतून नाशिकरोड विभाग
सहाय्यक आयुक्त अंबादास भुसारे : नाशिकरोडमधून विशेष शाखेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed