• Sat. Sep 21st, 2024
दुर्दैवी! पन्हाळ्यात पाण्यात बुडून बैलजोडीचा मृत्यू, तर ४ जनावरांचा आगीत होरपळून मृत्यू

कोल्हापूर: कोल्हापूर जिल्हयात मुसळधार पाऊस सुरू असल्याने जिल्हयातील नद्यांना पूर आला आहे. यामुळे माणसांसह अनेक प्राण्यांना देखील याचा फटका बसत असून आज दुपारच्या सुमारास कासारी नदीच्या पुराचे पाणी पाहून बिथरलेल्या बैलजोडीचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. ही घटना पन्हाळा तालुक्यातील कसबा ठाणे येथे घडली असून या घटनेत सुदैवाने बैलजोडी मालक बचावला आहे. तर दुसऱ्या बाजूला काल रात्रीच्या सुमारास पन्हाळा तालुक्यातीलच उत्रे येथे एका जनावराच्या गोठ्याला आग लागल्याने चार जनावरांचा आगीत होरपळून मृत्यू झाला आहे.

पाण्यात गुदमरून जनावरांचा मृत्यू

याबाबतीत अधिक माहिती अशी की, आज दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास पन्हाळा तालुक्यातील कसबा ठाणे येथे राहणारे महादेव महाडिक हे आपल्या दोन बैलांना घेऊन छोट्या बैलगाडीला जुंपून ते बैलांना धुण्यासाठी कासारी नदी परिसरात गेले होते. सध्या मुसळधार पावसामुळे सर्वच नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत असून अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झालेली होती.

धक्कादायक! शेतकऱ्याने बँकेतून पीककर्ज काढले, रक्कम घेऊन जात असताना चोरट्यांनी साधला डाव
दरम्यान, कासारी नदीला ही मोठ्या प्रमाणत पाणी आल आहे. पुराचे पाणी असूनही बैलजोडी मालकाने ही बैलगाडी पुढे नेली आणि पुराचे पाणी पाहून बैल अचानक बिथरले आणि बाहेर पडण्यासाठी धडपडू लागले. मात्र यावेळी पाण्यात गुदमरून दोन्ही बैलांचा दुर्देवी मृत्यू झाला. तर सुदैवाने या घटनेत बैल मालक थोडक्यात बचावले. मात्र या बैलजोडीच्या मालकाचे सुमारे दीड लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे बोलले जात असून यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

धक्कादायक! माजी सैनिकाने टोकाचा निर्णय घेत संपवले जीवन, कारण अस्पष्ट, लातूर शहरात खळबळ
आगीत होरपळून ४ जनावरांचा मृत्यू

तर एका बाजूला पाण्यात बुडून २ बैलांचा मृत्यू झालेला असताना दुसऱ्या बाजुला काल पन्हाळा तालुक्यातीलच उत्रे या गावात गोठ्याला अचानक आग लागल्याने ४ जनावरांचा आगीत होरपळून मृत्यू झाला आहे. गुंडोपंत कृष्णा हांडे यांच्या जनावराच्या गोठ्याला ही आग लागली. यामध्ये चार जनावरांचा होरपळून मृत्यू झाला तर संपूर्ण शेड जळून खाक झाले. यामध्ये सुमारे तीन लाख ७० हजारांचे नुकसान झाले आहे.

शरद पवारांची राष्ट्रवादी पुन्हा फुटणार? अर्थमंत्री होताच अजित पवारांची मोठी खेळी, ‘चाणक्या’चे आमदार चिंतेत
पन्हाळा तालुक्यातील उत्रे गावच्या शेजारी मठाजवळ वैरणीची साठवणूक करण्यासाठी व जनावरे बांधण्यासाठी हांडे यांनी गोठा बांधला होता. काल रात्री जनावरांना वैरण घालून डासांचा त्रास नको म्हणून धुमी घालून रात्री आठच्या सुमारास ते घरी गेले होते. मात्र मध्यरात्री अचानक गोठयाला आग लागल्याचे जवळपास राहणाऱ्या लोकांच्या लक्षात येताच ग्रामस्थांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र आग आटोक्याच्या बाहेर गेल्याने या आगीमध्ये एक म्हैस, एक गाय, एक रेडी, एक पाडा अशी चार जनावरे होरपळून मृत्युमुखी पडली, तर एका म्हशीला वाचवण्यात यश आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed