• Sat. Sep 21st, 2024
छापेमारीनंतर काही तासांतच पुन्हा पार्टी; रशियन डान्सर नाचवली, पोलीस कारवाई न करताच परतले, कारण…

नागपूर: गुन्हेगारांमध्ये पोलिसांचा धाक संपुष्टात येऊ लागला आहे. रविवारी नागपूरात घडलेल्या एका घटनेवरून असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. शनिवारी कळमना पोलीस ठाण्यांतर्गत एका अनधिकृत पार्टीवर पोलिसांनी छापा टाकला. क्रिकेट बुकी आशिष कुकडे उर्फ बोमा याने आयोजित केलेल्या या पार्टीत पोलिसांनी एक कोटींच्या मालासह २८ जणांना अटक केली. मात्र पोलिसांच्या या कारवाईचा बुकींवर काहीही परिणाम झाला नाही. कारवाईच्या २४ तासांनंतर ग्रामीण भागात पुन्हा पार्टी देऊन बुकीने पोलिसांना आपला इंगा दाखवला.
संभाजीराजे जमिनीच्या पोटात गडप झालेल्या इर्शाळवाडीत पोहोचले; संहार पाहून डोळे टचकन पाणावले
एवढेच नाही तर रशियन युवतींनाही यावेळी बोलावण्यात आले होते. पार्टीची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि कोणतीही कारवाई न करता परतले. त्यानंतर पोलिसांच्या बाबतीत उलट चर्चा सुरू झाली. मिळालेल्या माहितीनुसार, क्रिकेट बुकी आशिष कुकडे ऊर्फ बोमा याचा शनिवारी वाढदिवस होता. वाढदिवसानिमित्त कळमना पोलीस ठाण्यांतर्गत रिझवान लॉन येथे त्यांनी दारू पार्टीचे आयोजन केले होते. विनापरवाना या पार्टीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती मिळताच डीसीपी झोन ५ श्रावण दत्त यांनी पथक तयार करून छापा टाकला. यावेळी पोलिसांनी २८ जणांना अटक करून एक कोटींहून अधिक किमतीचा माल जप्त केला. पोलिसांच्या या कारवाईनंतर बुकी कुकडे याने २४ तासांनंतर पुन्हा पार्टी दिली.

एकनाथ शिंदेंच्या जागी अजित पवार मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चा, अंबादास दानवे काय म्हणाले?

मात्र, यावेळी शहराच्या हद्दीत पार्टी न देता ग्रामीण भागात ही पार्टी दिली. बुकी बोमाने शनिवारपेक्षा रविवारी अधिक आलिशान पार्टी दिली. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही पार्टी छिंदवाडा रोडवर देण्यात आली होती. मागच्या धाडीपासून धडा घेत या बुकीने उत्पादन शुल्क विभागाकडून रीतसर दारूचा परवाना घेऊन यावेळी सहकाऱ्यांना दारू पाजली. एवढेच नाही तर एका रशियन डान्सरलाही यावेळी बोलावण्यात आले होते. पार्टीची माहिती मिळताच ग्रामीण पोलिसांचे ३० ते ३५ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलीस येताच व्हिडिओ बनवण्यास सुरूवात केली. पोलिसांना पाहताच गोंधळ उडाला. मात्र काही काळ थांबून ते सर्व पोलीस कोणतीही कारवाई न करता परतले. त्याचवेळी ही माहिती समोर आल्यानंतर पोलिसांवर प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed