• Sat. Sep 21st, 2024
पुणेकरांसाठी गुड न्यूज; वर्षभरासाठी पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली, खडकवासला धरण इतके टक्के भरले

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला, पानशेत, टेमघर आणि वरसगाव या धरण प्रकल्पात आता पिण्यासाठी वर्षभर पुरेल एवढा पाणीसाठा जमा झाला आहे. त्यामुळे पुणेकरांच्या पिण्याच्या पाण्याची तूर्त चिंता मिटली आहे. धरणांमध्ये सोमवारी सायंकाळपर्यंत १७.२१ अब्ज घनफूट (टीएमसी) पाणीसाठा जमा झाला असून गेल्या वर्षीच्या तुलनेत ३.२७ टीएमसी पाणीसाठा कमी आहे.

गेल्या काही दिवसांपासून खडकवासला साखळी प्रकल्पातील धरणात संततधार पावसाने चांगली हजेरी लावली. त्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात चांगली वाढ होत आहे. पावसाचा जोर फारसा वाढला नसला, तरी घाटमाथ्यासह धरण क्षेत्रातील पावसाच्या हजेरीमुळे धरणातील पाण्याची पातळी वाढण्यास मदत झाली आहे. त्यामुळे आजमितीला खडकवासला साखळी प्रकल्पात ५९.०३ टक्के म्हणजेच १७.२१ टीएमसी एवढा पाणीसाठा जमा झाला आहे. गेल्या वर्षी याच दिवशी धरण प्रकल्पात २०.४८ टीएमसी (७०.२८ टक्के) पाणीसाठा होता. त्या तुलनेत सध्या ३.२७ टीएमसी पाणीसाठा कमी आहे.

लाडक्या काकासाठी मटण घेऊन आला होता पुतण्या;सहायक पोलिस आयुक्तने जेवणानंतर आधी पत्नी आणि मग पुतण्यावर…
खडकवासला धरण

आज दिनांक २४ जुलै २०२३ रोजी खडकवासला धरण ८२% टक्के क्षमतेने भरले आहे.तरी धरण क्षेत्रात सततच्या पडत असणाऱ्या पावसामुळे धरण पातळीमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे येत्या २४ ते ४८ तासांमध्ये खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू करण्याची दाट शक्यता आहे.यामुळे पाटबंधारे विभागाकडून नदीपात्रात कोणीही उतरू नये आणि नदीपात्रात तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

पाकिस्तानचा खोटारडेपणा उघड; फसवून जिंकला आशिया कप; फायनल मॅचमध्ये चक्क ६ खेळाडू होते…

पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ, जिल्हा प्रशान अर्लट मोडवर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed