पिंपरी: पिंपरी चिंचवड शहरातील प्राधिकरणातील मूकबधिर शाळेजवळील मोकळ्या जागेत एक ज्येष्ठ नागरिक व्यक्ती चिखला मध्ये रूतून बसला असल्याची घटना आज सकाळच्या सुमारास घडली. संबधित व्यक्ती शॉर्ट कट मारून जात होता. मात्र शॉर्ट कट मारणे त्यांना भलतेच महागात पडले आहे. रस्त्यावरून जात असताना तो चिखलात तो रुतून बसला होता. अग्निशमन दलाकडून त्या व्यक्तीची सुखरूप सुटका करण्यात आली. नीळकंठ पाटील असे या बाहेर काढण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव असून निगडी परिसरात हा प्रकार घडला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, निगडी परिसरात असणाऱ्या एका मुक बधीर शाळेच्या पाठीमागे असणाऱ्या जागेत चिखलात एक व्यक्ती जात असताना ही व्यक्ती चिखलात रुतली. गेल्या चार दिवसांपासून पावसाची संततधार सुरू असल्याने या भागात दलदल झाली आहे. मात्र ही दलदल संबधित व्यक्तीच्या लक्षात न आल्याने हा प्रकार घडला असल्याचे समोर आले आहे.

पाटील हे चिखलात रुतले असल्याचे जवळून जाणाऱ्या नागरिकांनी पाहिले. त्यांनी तत्काळ अग्निशामक दलाच्या जवानांना या संदर्भात माहिती दिली. माहिती मिळताच अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी त्यांना वाचवण्यासाठी दोर, शिडी आणि हुक याचा वापर करून संबधित व्यक्तिला बाहेर काढले.
पिंपरी चिंचवड शहरात पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे वर्दळीच्या ठिकाणी घटना घडत आहेत. काल सकाळच्या सुमारास रस्ता खचला आणि बांधकाम सुरू असलेल्या इमारतीचे बांधकाम कोसळले. त्यामुळे मोठे नुकसान झाले. आज सकाळी ही व्यक्ती चिखलात रुतली. घटना लवकर लक्षात आल्याने त्यांना वेळेत मदत मिळाली आणि त्यांची सुखरूप सुटका करण्यात आली.