• Sat. Sep 21st, 2024

बुलढाण्यात पावसाचा कहर; दूध काढण्यासाठी गेलेल्या बाप-लेकावर भिंत कोसळली, वडिलांचा मृत्यू

बुलढाण्यात पावसाचा कहर; दूध काढण्यासाठी गेलेल्या बाप-लेकावर भिंत कोसळली, वडिलांचा मृत्यू

बुलढाणा: मागील दोन दिवसापासून जिल्ह्यासह संपूर्ण तालुक्यांना पावसाने चांगलेच झोडपले आहे. यात नांदुरा तालुक्यात पाऊस चांगलाच बरसला असून या संततधार पावसामुळे अनेक गावांमध्ये पाणी साचल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. पावसात मामुलवाडी येथे भिंत पडून एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. राष्ट्रीय महामार्गावरील वडी व कोलासर नजीकचे दोन्ही पूल खचल्याने महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.


भिंत पडून वडिलांचा मृत्यू, मुलगा जखमी:

नांदुरा तालुक्यातील मामुलवाडी येथे अतिवृष्टीने भिंत पडल्याने वडिलांचा मृत्यू झाल्याची घटना १९ जुलै रोजी सकाळी घडली. तसेच या दुर्घटनेत मुलगा जखमी झाला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, मामुलवाडी चांदूर बिस्वा सूनगाव केदार येरळी येथे बुधवारी सकाळी जोरदार पाऊस झाला .अतिवृष्टीमुळे मामुलवाडी येथे जाणारे रस्ते बंद असून संपर्क तुटला आहे. अल्पभूधारक शेतकरी प्रताप नामदेव गावंडे (वय वर्ष ६०) आणि त्यांचा मुलगा शुभम प्रताप गावंडे दूध काढण्यासाठी घरामागे गेले असता त्यांच्या अंगावर देवीच्या मंदिराची भिंत पडून दोघेही मातीच्या ढिगाऱ्याखाली दबले गेले.

खालापूरजवळील इर्शाळवाडीत दरड कोसळली, १०० पेक्षा जास्त लोक अडकल्याची भिती

गावकऱ्यांनी त्यांना मातीच्या ढिगाऱ्याखालून बाहेर काढले. मात्र, प्रताप गावंडे यांचा यात मृत्यू झाला. अतिवृष्टीमुळे मामुलवाडीत येणारे सर्व रस्ते बंद असल्याने गावाचा संपर्क तुटला आहे त्यामुळे वेळेवर मदत मिळाली नाही. बाजार समितीचे संचालक गौरव पाटील यांनी मदत केली. आमदार राजेश ऐकडे यांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ अधिकाऱ्यांना घटनास्थळी जाऊन मदत करण्याच्या सूचना दिल्या.

मुसळधार पावसाने शेतात पाणीच पाणी साचल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तर शहराच्या विविध भागात तसेच व्यापारी संकुलामध्ये सुद्धा पाणी साचले होते. जिल्ह्यात सर्व तेरा तालुक्यांमध्ये पाऊस बरसला आहे .खामगाव शहर व परिसरात दोन दिवसांपूर्वी तब्बल चार इंच पाऊस झाला होता .तर १८जुलैच्या रात्रीपासून दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजेपर्यंत तब्बल ३४.२ मीटर म्हणजे सव्वा इंच पाऊस झाल्याची नोंद कृषी उत्पन्न बाजार समितीने केली आहे.

मलकापूर तालुक्यात तब्बल १८ तासापर्यंत पावसाने संताधार लावली होती. या झालेल्या पावसाची नोंद प्रशासना दरबारी १२५ मिलिमीटर करण्यात आली आहे तर दुसरीकडे नदी पूर्ण मायला सुद्धा प्रचंड प्रमाणात पूर आल्याने खबरदारी म्हणून हातनूर धरणाच्या बॅक वॉटर मुळे मलकापूर तालुक्यातील गावे प्रभावित होण्याची शक्यता पाहता हतनुर धरणाचे अंदाजे 28 ते 30 दरवाजे उघडण्यात आले असल्याची माहिती असून. प्राप्त माहितीनुसार एक लाख ५७ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्याचे समजते.

आतापर्यंत सरासरीच्या ३०.४९ % पर्जन्यमान:
बुलढाणा जिल्ह्याचे माहे जून ते सप्टेंबर या कालावधीतील सरासरी पर्जन्यमान ७६१.०६ मिलिमीटर आहे. बुधवार १९ जुलै २०२३ पर्यंत २३२. २ मी मीटर म्हणजे सरासरी ३०. ४९% पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. सर्वाधिक शेगाव तालुक्यात सर्वाधिक कमी बुलढाणा तालुक्यात पर्जन्यमानाची नोंद झाली आहे.

घर नाही, फक्त मातीच! आई-बाबांना पळताही आलं नाही… दरड दुर्घटनेत बचावलेल्या मुलाने सांगितला काटा आणणारा प्रसंग

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed