• Mon. Nov 25th, 2024
    बेंचवर बसण्यावरुन वाद, मधल्या सुट्टीत एकट्याला गाठून जबर मारहाण; नेमकं काय घडलं?

    सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर : शाळेतील वर्गात बेंचवर बसण्यावरून मित्रांमध्ये वाद झाला. या वादात मधल्या सुट्टीत चार वर्ग मित्रांनी मिळून केलेल्या बेदम मारहाणीमध्ये एका ११ वर्षीय विद्यार्थ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान, या प्रकरणी दौलताबाद पोलीस ठाण्यामध्ये चार अल्पवयीन मुलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कार्तिक मनोहर गायकवाड (वय ११, रा. दौलताबाद) असं मयत झालेल्या मुलाचे नाव आहे. कार्तिक हा दौलताबाद येथील देवगिरी विद्यालयामध्ये सातव्या वर्गामध्ये शिकत होता. ६ जुलै रोजी सकाळी साडेदहा वाजता सर्व विद्यार्थी वर्ग खोलीमध्ये बसले होते. यावेळी बेंचवर बसण्यावरून कार्तिक याच्या वर्ग मित्रांनी वाद घातला.

    Raigad Landslide : इर्शाळवाडी दरड दुर्घटनेची शहांकडून दखल, मुख्यमंत्र्यांकडून मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख
    या वादाचा राग मनात धरून चार मित्रांनी शाळेच्या मधल्या सुट्टीमध्ये कार्तिक मैदानावर खेळत असताना त्याला गाठलं. यामध्ये एक वर्गमित्र आणि इतर वर्गातील तीन मित्र असे मिळून चार जणांनी कार्तिकला बेदम मारहाण केली. या मारहाणीनंतर कार्तिक जखमी झाला होता. त्यानंतर कार्तिक पोटात दुखतंय, असं सांगून शाळेत जात नव्हता. त्याला ११ जुलै रोजी त्रास वाढल्याने त्याच्या वडिलांनी त्याला तात्काळ दवाखान्यात दाखवले. मात्र, कार्तिकचा त्रास कमी झाला नाही. त्यानंतर त्याला कन्नड येथील आणि त्यानंतर संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं. दरम्यान, कार्तिक याच्यावर उपचार सुरू असताना त्याची प्राणज्योत मालवली.

    दरम्यान, या प्रकरणी शाळेच्या मुख्याध्यापकांशी चर्चा केली असता त्यांनी ही घटना मैदानावर घडलीच नसल्याचं सांगितलं आहे. घटनेनंतर कार्तिकच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून दौलताबाद पोलीस ठाण्यामध्ये चार अल्पवयीन मुलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    घर नाही, फक्त मातीच! आई-बाबांना पळताही आलं नाही… दरड दुर्घटनेत बचावलेल्या मुलाने सांगितला काटा आणणारा प्रसंग

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed