• Mon. Nov 25th, 2024

    गरोदर मातेला जीवाची बाजी लावून पुराच्या पाण्यातून बाहेर काढले, मात्र, पुढे घडलं धक्कादायक

    गरोदर मातेला जीवाची बाजी लावून पुराच्या पाण्यातून बाहेर काढले, मात्र, पुढे घडलं धक्कादायक

    गडचिरोली : एका गरोदर मातेला प्रसूतीच्या कळा सुरू असल्याचा कॉल येताच प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी, आशा वर्कर आणि गट प्रवर्तक असे आरोग्य विभागाची भली मोठी चमू गरोदर मातेचा गाव गाठतात. मात्र,मागील दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असल्याने लगतचे नदी-नाले तुडुंब भरून वाहत आहेत. पूरपरिस्थिती असल्याने त्या गावाला पाण्याचा वेढा होता. अशा परिस्थितीत आरोग्य विभागाची चमू डोंग्याचा आधार घेऊन तिचे घर गाठतात. जीव धोक्यात टाकून तिला पुराच्या पाण्यातून बाहेर काढत तब्बल २५ किलोमीटर अंतरावर असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करून आरोग्य तपासणी करतात. मात्र, प्रसूतीला वेळ असल्याचे कळताच त्या गरोदर मातेने येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांचा एक न ऐकता पळ काढल्याची धक्कादायक घटना गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यात घडली.

    सविस्तर वृत्त असे की अहेरी तालुक्यातील कमलापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात समाविष्ठ रुमालकसा येथून सुशीला श्यामराव मडावी (२७) या गरोदर मातेला प्रसूतीच्या कळा सुरू असल्याचा कमलापूर येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांना कॉल येतो. लगेच येथील वैद्यकीय अधिकारी डॉ राजेश मानकर यांनी सोबतचे डॉ.संतोष नैताम, आशा वर्कर व गट प्रवर्तक रुग्णवाहिका घेऊन दामरंचा वरून २ ते ३ किलोमीटर अंतरावर असलेल्या रुमालकसा गाव गाठतात.

    Naresh Goyal : जेट एअरवेजचे नरेश गोयल यांच्या अडचणीत वाढ, ईडीकडून नवा गुन्हा दाखल, आठ ठिकाणी छापे
    मात्र, येथील बांडीया नदीला पूर आल्याने त्या गावाला चारही बाजूने अक्षरशः पाण्याचा वेढा होता. अशाही परिस्थितीत आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून छोट्याशा नावाने जलप्रवास करत तिला पुराच्या पाण्यातून बाहेर काढत कमलापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करत तिची आरोग्य तपासणी केली.

    आरोग्य तपासणीत प्रसुतीला वेळ असल्याचे कळले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे २७ जुलै ला तिची प्रसूतीची तारीख आहे. मात्र,रुमालकसा गाव हे अतीदुर्गम भागात वसले असलेतरी गावापर्यंत डांबरीकरण रस्ता आहे. मात्र, या भागातील नदी नाल्यांना पूर आल्याने रुमालकसा गावाला चारही बाजूने पाण्याने वेढले आहे. अशा परिस्थितीत गरोदर मातेला घरी न ठेवता प्राथमिक आरोग्य केंद्रातच राहण्याचा सल्ला येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिला.

    Kolhapur Rain: जिल्ह्यात ३० बंधारे पाण्याखाली, अनेक गावांचा संपर्क तुटला, किल्ल्यावर अडकलेले पर्यटक सुखरूप
    मात्र, त्या गरोदर महिलेने वैद्यकीय अधिकाऱ्यांची एक न ऐकता प्राथमिक आरोग्य केंद्रातून घरी जाण्यासाठी पद काढल्याची धक्कादायक घटना १९ जुलै रोजी सायंकाळच्या सुमारास घडली. येथील वैद्यकीय अधिकारी तसेच इतर कर्मचाऱ्यांनी अनेकदा विनवणी करूनही ती महिला थांबली नाही. परंतु ती गरोदर माता घरी पोहोचली की नाही याची माहिती कळू शकली नाही.

    चंद्रपुरात १०० वर्षात पहिल्यांदाच झाला असा पाऊस; अभ्यासकांनी सांगितलं खरं कारण, जाणून घ्या १०० वर्षांमधील स्थिती
    एकीकडे आरोग्य विभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी तिला आणि तिच्या बाळाच्या जीवाला धोका होऊ नये म्हणून पुराच्या पाण्यातून वाट काढत स्वतःचा जीव धोक्यात घालून तिला बाहेर काढले.योग्य उपचार देण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्या गरोदर महिलेने वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केलेल्या मार्गदर्शनाला न जुमानता प्राथमिक आरोग्य केंद्रातून पळ काढल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पावसाळ्यातील पूरपरिस्थिती लक्षात घेता अतिदुर्गम भागातील गरोदर मातांना प्रसूतीसाठी आरोग्य विभागाकडून तालुका मुख्यालयात असलेल्या माहेर घरी ठेवण्याचा प्रयत्न केला जात असताना या महिलेने स्वतःचा जीव धोक्यात टाकण्याचा प्रयत्न केला आहे.

    त्या गरोदर महिलेला पुराच्या पाण्यातून बाहेर काढून उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. प्रसूतीला वेळ असल्याचे तिला कळताच तिने कर्मचाऱ्यांचा एक न ऐकता प्राथमिक आरोग्य केंद्रातून निघून गेली आहे. तिला आणतानाही तेवढाच त्रास सहन करावा लागला होता. आम्ही स्वतःचा जीव धोक्यात घालून तिला योग्य उपचार देण्याचा प्रयत्न केला. मात्र, ती महिला कोणत्याही कर्मचाऱ्याचा ऐकण्यासाठी तयार नव्हती.

    डॉ.राजेश मानकर, आरोग्य अधिकारी, कमलापूर.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *