• Sun. Mar 15th, 2026

    अमेरिकेला उद्ध्वस्त करणारा कट

    ByMH LIVE NEWS

    Mar 15, 2026
    अमेरिकेला उद्ध्वस्त करणारा कट

    अमेरिका आणि इस्रायलकडून इराणवर भीषण हल्ले होत आहेत. अशातच आता इराणकडून एक मोठा दावा करण्यात आला आहे. इराणने म्हटले की जेफ्री एपस्टीनच्या मित्रांचे एक नेटवर्क अमेरिकेत 9/11 सारखा हल्ला घडवून आणण्याची योजना आखत आहे. असा हल्ला झाल्यानंतर या हल्लाचा आरोप इराणवर केला जाऊ शकतो. अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्ध आणखी तीव्र होत असताना हा दावा करण्यात येत आहे. अमेरिकेना एका आठवड्यात युद्ध जिंकण्याचे स्वप्न पाहिले होते, मात्र अद्याप यात यश आलेले नाही. याच काळात इराणने खळबळ उडवून देणारा दावा केला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

    अमेरिकेवर भीषण हल्ला होणार

    इराण आणि अमेरिकेतील युद्धाबाबत इराणचे माजी सर्वोच्च नेते अली खामेनेई यांचे प्रमुख सल्लागार अली लारिजानी यांनी सोशल मीडियावर इराणची भूमिका मांडली आहे. त्यांनी म्हटले की, ‘मी ऐकले आहे की एपस्टीन नेटवर्कचे उरलेले सदस्य 9/11 सारखी घटना घडवून आणण्याची योजना आखत आहेत. त्यानंतर या हल्ल्याचा आरोप इराणवर टाकण्याचा त्यांचा विचार आहे. इराण अशा कोणत्याही दहशतवादी कटाचा विरोध करतो आणि आमचे अमेरिकन जनतेशी कोणतेही युद्ध नाही.’ लाजीरानी यांच्या या विधानानंतर आता डोनाल्ड ट्रम्प यांची झोप उडाली आहे.

    ट्रम्प यांच्यावर टीका

    इराण आणि अमेरिका या देशांमध्ये युद्ध सुरू झाल्यापासून अलि लारिजानी सतत अमेरिका आणि राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका करत आहेत. त्यांनी ट्रम्प यांना एपस्टीनचा जवळचा मित्र म्हटले होते. एका परेडदरम्यान अमेरिकन जनतेला संबोधित करताना लारिजानी यांनी म्हटले होते की, ‘इराणचे नेते लोकांमध्ये राहतात, पण अमेरिकेचे नेते एपस्टीन आयलंडवर राहतात. ट्रम्प यांचे नाव जेफ्री एपस्टीनच्या फाइल्समध्ये अनेकदा समोर आले आहे.’ ट्रम्प यांचे विरोधक असेही म्हणतात की एपस्टीन फाइल्समधून लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी ट्रम्प यांनी व्हेनेझुएला आणि इराणवर हल्ला केला आहे.

    एपस्टीन फाईल्समुळे अनेकजण अडचणीत

    दुसरीकडे डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेकदा स्पष्ट केले आहे की, त्यांचा आणि एपस्टीनचा कोणताही विशेष संबंध नव्हता आणि ते कधीही एपस्टीन आयलंडवर गेले नाहीत. मात्र तरीही ट्रम्प विरोधक त्यांना एपस्टीनचा जवळचा सहकारी मानत आहेत. एपस्टीनवर अल्पवयीन मुला-मुलींवर लैंगिक अत्याचार, मारहाण, आर्थिक गैरव्यवहार आणि अपहरण यांसारखे गंभीर आरोप होते. एपस्टीनचा मृत्यू झाला असला तरी अमेरिकन गुप्तचर संस्थांनी याची चौकशी केली होती. यातील माहिती आता सार्वजनिक होत आहे. यात जगातील अनेक प्रसिद्ध लोकांचा समावेश होता.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed