• Sun. Jun 14th, 2026

    मुलगी बिनलग्नाचीच राहिली गरोदर, गर्भपात करणार इतक्यात लागलं Lockdown

    ByMH LIVE NEWS

    Mar 15, 2026
    मुलगी बिनलग्नाचीच राहिली गरोदर, गर्भपात करणार इतक्यात लागलं Lockdown

    सध्याच्या काळात बॉलिवूड सिनेमांसोबत साऊथकडील सिनेमांनासुद्धा प्रेक्षकांची भरपूर पसंती मिळते. ओटीटी प्लॅटफॉर्मवरही साऊथकडील बरेच सिनेमे डब करुन पाहिले जातात. असाच एक साऊथकडील सुपरस्टार अभिनेत्री अनुपमा परमेश्वरनची प्रमुख भूमिका असलेला प्रेमम हा चित्रपट. तो एक मल्याळम रोमँटिक चित्रपट होता. अभिनेत्री अनुपमा अचानक चर्चेत आली असून याचे कारण म्हणजे तिचा Lockdown हा चित्रपट. हा सिनेमा जानेवारी 2026 मध्ये थिएटरमध्ये रिलीज झाला होता. आता, बुधवार, 11 मार्च रोजी हा चित्रपट ओटीटी (OTT) प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात आला आहे. बुधवारी ‘लायका प्रॉडक्शन्स’ने सोशल मीडियाद्वारे अशी घोषणा केली त्यांचा Lockdown हा थ्रिलर-ड्रामा चित्रपट आता ओटीटी प्लॅटफॉर्म ‘Amazon Prime Video’ वर पाहण्यासाठी उपलब्ध आहे. तमिळ आणि तेलुगू भाषांव्यतिरिक्त, तुम्ही हा चित्रपट त्याच्या हिंदी-डब केलेल्या वर्जनमध्येही पाहू शकता. आता, तुम्हाला कदाचित प्रश्न पडला असेल की या चित्रपटामध्ये नक्की असे काय आहे, ज्यामुळे त्याची इतकी चर्चा होत आहे?


    लॉकडाऊन हा मुळचा तमिळ चित्रपट आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन ए.आर. जीवा यांनी केले आहे. या चित्रपटात अनुपमा परमेश्वरनने मुख्य भूमिका साकारली असून, चार्ली, लिव्हिंगस्टन, निरोशा आणि प्रिया वेंकट यांसारख्या कलाकारांनी या सिनेमात अभिनय केला हता. या चित्रपटाचा प्रीमियर 23 नोव्हेंबर 2025 रोजी गोव्यामध्ये आयोजित 56 व्या ‘आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात’ (IFFI) पार पडलेला. त्यानंतर, 30 जानेवारी 2026 रोजी हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित करण्यात आला.

    ‘लॉकडाऊन’ चित्रपटाची कथा

    चित्रपटाच्या नावावरुनच, तुम्हाला या सिनेमाच्या कथानकाचा सहज अंदाज लावता येऊ शकतो. या चित्रपटाची पार्श्वभूमी ‘लॉकडाऊन’च्या काळातील म्हणजेच कोविड-19 महामारीच्या आव्हानात्मक काळातली आहे. सिनेमाची कथा चेन्नईतील घडल्याचे दाखवले आहे. तिथे ‘अनिता’ नावाची एक तरुणी राहत असते. मध्यमवर्गीय कुटुंबातील अनिता बरीच स्वप्न उराशी बाळगून असते. आपण आपल्या करियरमध्ये खूप पुढे जावं असं तिला वाटत असतं.. अनिता ही एका सनातनी कुटुंबातील जबाबदार आणि थोरली मुलगी असते. पण तिचे आयुष्य अचानकच एका भयंकर विळख्यात सापडते. ज्यामुळे तिची सगळी स्वप्न धुळीस मिसळतात. करोना महामारीच्या काळात ज्या वेळी सरकारने देशभरात ‘लॉकडाऊन’ घोषित केलेला असतो त्याच वेळी अनिता आपल्या मनात एक गुपित दडवून बसली असते. पुढे ते गुपित तिच्या इच्छेविरुद्ध जगासमोर उघडकीस होणार असते. शिवाय, लॉकडाऊनमुळे, या कठीण पेचप्रसंगाचा सामना तिला पूर्णपणे एकटीनेच करणे भाग पडलेले असते.


    योगायोगाने, तिच्या वैयक्तिक आयुष्यातील काही विचित्र परिस्थितींच्या दरम्यान, अनिताला आपण गर्भवती असल्याचे समजते. तिने ही गोष्ट सर्वांपासून लपवून ठेवली असते. तिच्या मैत्रिणी तिला गर्भपात करण्याचा सल्ला देतात. अनिता अविवाहित असते. अशातच बाहेर ‘लॉकडाऊन’ सुरू असताना, गरोदरपणात ती घरात पूर्णपणे एकाकी पडली आहे. ही कथा हळूहळू उलगडत जाते. कथेतील भावनिक तीव्रता आणि ड्रामा हळूहळू वाढत जाऊन अखेरीस तो उत्कंठावर्धक वळणाला येतो. अनिताच्या या मानसिक घालमेलीमुळे, एक प्रेक्षक म्हणून तुम्हीही एका प्रकारच्या शांत आणि खोलवर रुजलेल्या नैराश्याच्या भावनेने वेढले जाता.

    सत्य घटनांवर आधारित एक कथा

    हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित असल्याचेही सांगितले जात आहे. गर्भपात करण्याचा प्रयत्न करत असताना, एका तरुण आणि अविवाहित महिलेला ज्या अडचणींचा सामना करावा लागतो, त्याचे चित्रण या चित्रपटात करण्यात आले आहे. या चित्रपटात अनुपमा परमेश्वरन, चार्ली, निरोशा, प्रिया वेंकट आणि लिव्हिंगस्टन यांच्या महत्वाच्या भूमिका आहेत.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed