• Sat. Sep 21st, 2024

BREAKING: माळीण दुर्घटनेची पुनरावृत्ती? खालापूरमध्ये वसाहतीवर दरड कोसळली, ५० हून अधिक जण अडकल्याची भीती

BREAKING: माळीण दुर्घटनेची पुनरावृत्ती? खालापूरमध्ये वसाहतीवर दरड कोसळली, ५० हून अधिक जण अडकल्याची भीती

रायगड: खालापूर येथील इरसाल गडाच्या पायथ्याशी असलेल्या वसाहतीवर मोठी दरड कोसळली असल्याची घटना घडली आहे. चौक गावापासून ६ किमी डोंगर भागात मोरबे धरणाच्या वरच्या भागात आदिवासी वाडी आहे. हा दरड येथील रहिवासी घरांवर कोसळली आहे. आदिवासी ठाकूर समाजाची घरे इथे असल्याची माहिती आहेत.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ९० % वाडी ढिगाऱ्याखाली गेली आहे, ३० ते ३५ आदिवासी घरांची मोठी वस्ती होती. या दुर्घटनेत मोठी जीवितहानी झाली असण्याची शक्यता आहे. जवळपास ५० हून अधिक लोक अडकल्याची भीती वर्तवली जात आहे. तर एका महिलेसह दोन लहान मुलांना वाचविण्यात बचाव कार्य पथकाला आतापर्यंत यश आले आहे. वर अजूनही माती पडत असल्याने बचावकार्य करणाऱ्यांनाही धोकाच निर्माण झाला आहे.
डीसी दत्तात्रय नवले आणि डीसी सर्जेराव सोनवणे यांना अनुक्रमे वैद्यकीय मदत आणि बचाव आणि निवारा व्यवस्था ऑपरेशन्ससाठी ओएसडी म्हणून नियुक्त केले आहे. घटनास्थळी चार रुग्णवाहिका पोहोचल्या आहेत. आरएच चौकात तालुका आरोग्य अधिकारी आणि चार डॉक्टरांसह चार रुग्णवाहिका सज्ज आहेत.
खाजगी डॉक्टरांचीही मदत THO ने बोलावली आहे.

ट्रॅकवरुन जाताना हातून ४ महिन्यांचं बाळ निसटलं अन् नाल्यात पडलं… आईचा हृदयपिळवटून टाकणारा आक्रोश
एकूण ४० ते ४५ घरांची वाडी या दरडीखाली अडकल्याची भीती स्थानिकांकडून व्यक्त केली जात आहे. मात्र, प्रशासनाकडून ३० ते ३५ घरांचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे आहे. घटनास्थळी युद्ध पातळीवरती मदत पथक पोहोचली आहेत. मात्र, सोसाट्याचा वारा तसेच वरून अद्यापही काही दगड खाली येत आहेत. यामुळे बचाव पथकालाही धोका निर्माण झाला आहे. पण, जे अडकले आहेत त्यांना तातडीने रेस्क्यू करून वाचवण्यासाठी युद्ध पातळीवरती प्रयत्न सुरू आहेत.

अंबरनाथ आणि बदलापूर रुळावर पाणी, रेल्वे वाहतुकीला फटका

तहसीलदार आयुब तांबोळी व त्यांचे प्रशासन या सगळ्या परिस्थिती लक्ष ठेवलं असून अनेक सामाजिक कार्य करणारे मदत पथक, रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाले आहेत. तर, मंत्री दादा भुसे आणि आमदार महेश बदालीही घटनास्थळी दाखल झाले आहेत.

१५०० बिस्किटांचे पॅकेट, १८०० पाण्याच्या बाटल्या, ५० ब्लँकेट, ३५ टॉर्च, २५ अधिकारी/कर्मचारी, फर्स्ट किट, हातमोजे, बँडेज खोपोलीतून पाठवण्यात आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed