• Mon. Nov 25th, 2024

    राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय, मुंबई आणि ठाण्याला ऑरेंज अलर्ट, पाहा हवामान विभागाचा अंदाज

    राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय, मुंबई आणि ठाण्याला ऑरेंज अलर्ट, पाहा हवामान विभागाचा अंदाज

    म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय झाला असून, दक्षिण कोकणात पुढील पाच दिवस, तर उत्तर कोकणात बुधवारी आणि गुरुवारी पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. घाट परिसरामध्येही तुरळक ठिकाणी तीव्र मुसळधार पाऊस होऊ शकतो. विदर्भातही या आठवड्यामध्ये सातत्यपूर्ण, तसेच तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता आहे. मुंबईमध्ये सोमवारी अनेक दिवसांनंतर दमदार पावसाने हजेरी लावली.
    Monsoon 2023 : मुंबई ठाण्यासह ७ जिल्ह्यांना ऑरेंजसह यलो अ‍ॅलर्ट जारी, पाऊस कसा असणार, हवामान विभागाची नवी अपडेट
    कोकणात सोमवारी दिवसभरात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. कुलाबा येथे सकाळी ८.३० ते सायं. ५.३० या कालावधीत ५१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली, तर माथेरान येथे ६४ मिलिमीटर पाऊस नोंदवला गेला. महाबळेश्वर येथेही दिवसभरात पावसाची दमदार उपस्थिती होती. महाबळेश्वर येथे ६१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. मुंबई, ठाणे, पालघर परिसरामध्ये मंगळवारी तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. रायगड, रत्नागिरीमध्ये शुक्रवारपर्यंत ऑरेंज अॅलर्ट देण्यात आला असून, रायगडमध्ये बुधवारी काही ठिकाणी अतिवृष्टीचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबईसाठी बुधवारी ऑरेंज अॅलर्ट, तर पालघर आणि ठाणे जिल्ह्यासाठी बुधवारी आणि गुरुवारी दोन्ही दिवशी ऑरेंज अॅलर्ट देण्यात आला आहे. त्यानंतरही कोकण विभागात पावसाचा जोर कायम राहील, अशी शक्यता आहे.
    Maharashtra Rain Alert : राज्यात पुढचे ३-४ तास महत्त्वाचे, मुंबई, पुण्यासह ८ जिल्ह्यांना पावसाचा इशारा
    घाट परिसरासाठी सावधगिरीचा इशारा देण्यात आला असून, पुणे जिल्ह्यातील घाट परिसराला शुक्रवारपर्यंत ऑरेंज अॅलर्ट कायम आहे. घाट परिसरात बुधवारी तुरळक ठिकाणी अतिवृष्टीही होऊ शकते. साताऱ्यात घाट परिसरात बुधवार ते शुक्रवार ऑरेंज अॅलर्ट आहे, तर कोल्हापूर जिल्ह्यात घाट परिसरात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.

    संभाव्य पूरस्थितीला तोंड देण्यासाठी कोल्हापूर सज्ज! एनडीआरएफची पहिली तुकडी दाखल

    मराठवाड्यात प्रतीक्षाच

    सध्या दक्षिण झारखंड आणि शेजारील परिसरामध्ये चक्रीय वातस्थिती निर्माण झाली आहे. मान्सून ट्रफही सध्या सक्रिय आहे, तसेच बंगालच्या उपसागरांत येत्या ४८ तासांमध्ये चक्रीय वातस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील मान्सूनला चालना मिळाली आहे. विदर्भामध्ये पुढील पाच दिवसांत सर्व जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता आहे. भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर या जिल्ह्यांमध्ये मंगळवारी ऑरेंज अॅलर्टही देण्यात आला आहे. या तुलनेत मराठवाड्यात मात्र या आठवड्यात फारसा पाऊस नाही. छत्रपती संभाजीनगर आणि जालना येथे मंगळवारी तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस होऊ शकेल. मात्र, उर्वरित मराठवाड्यात हलक्या ते मध्यम सरींचाच अंदाज आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed