• Mon. Nov 25th, 2024

    राज्यात कुठे मुसळधार तर कुठे मध्यम स्वरुपाचा पाऊस पडणार, नवी अपडेट समोर

    राज्यात कुठे मुसळधार तर कुठे मध्यम स्वरुपाचा पाऊस पडणार, नवी अपडेट समोर

    मुंबई : राज्यात यंदा मान्सूनचा पाऊस उशिरानं दाखल झाला आहे. दरवर्षीच्या तुलनेत यंदा राज्यातील पावसाची स्थिती चिंता वाढवणारी आहे. राज्यातील धरणांमधील जलसाठा देखील गतवर्षीच्या तुलनेत कमी आहे. पाऊस समाधानकारक नसल्यानं काही ठिकाणी पेरण्या खोळंबलेल्या आहेत. मुंबईसह राज्यातील काही शहरांमध्ये कालपासून पावसाचा जोर वाढला आहे. मुंबई विभागीय हवामान केंद्रानं पुढील चार दिवसांसाठी हवामानाचा अंदाज जारी केला आहे. यामध्ये कोकण आणि उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांना अ‍ॅलर्ट जारी करण्यात आले आहेत.

    ऑरेंज आणि यलो अ‍ॅलर्ट जारी

    भारतीय हवामान विभागाच्या मुंबई विभागीय हवामान केंद्रातर्फे पुढील चार दिवसांमध्ये पाऊस कसा राहील यासंदर्भात अंदाज वर्तवला आहे. मुंबई,पालघर,ठाणे,रायगड व रत्नागिरी या जिल्ह्यांमधील काही ठिकाणी पुढील ४ दिवस मुसळधार,तर सिंधुदुर्ग व धुळे या जिल्ह्यांच्या काही भागांत मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन मुंबईच्या विभागीय हवामान केंद्राने केले आहे.
    Asia Cup 2023 पुन्हा एकदा संकटात, पाकिस्तानने आता कोणता हट्ट धरला आहे जाणून घ्या…

    या जिल्ह्यांसाठी अ‍ॅलर्ट जारी

    पालघर जिल्ह्याला १७ आणि २१ जुलै रोजी यलो अ‍ॅलर्ट देण्यात आला आहे. तर, १८ ते २० जुलै दरम्यान ऑरेंज अ‍ॅलर्ट देण्यात आला आहे.

    ठाणे जिल्ह्यात १७ ते २० जुलैपर्यंत ऑरेंज अ‍ॅलर्ट जारी करण्यात आलेला आहे. तर, २१ जुलै रोजी यलो अ‍ॅलर्ट देण्यात आला आहे.

    मुंबईमध्ये देखील मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. १७ ते १९ जुलैपर्यंत ऑरेंज अ‍ॅलर्ट देण्यात आला असून २०-२१ जुलै रोजी यलो अ‍ॅलर्ट देण्यात आला आहे.

    रायगड आणि रत्नागिरीसाठी पुढील चार दिवस खूप महत्त्वाचे आहेत. दोन्ही जिल्ह्यांना पुढील चार दिवसांसाठी ऑरेंज अ‍ॅलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळं दोन्ही जिल्ह्यांमधील विविध ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो.
    टेकऑफ होणार तोच मोबाइल फोनचा स्फोट; १४० प्रवासी असलेले एअर इंडियाच्या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग
    सिंधुदुर्गला पुढील चार दिवसांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर, धुळे जिल्ह्याला उद्यासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
    तुम्ही आल्याशिवाय कोणालाही भेटणार नाही, शरद पवारांनी जयंत पाटलांसाठी अजितदादांच्या गटाला ताटकळत ठेवलं

    पुण्याच्या मावळ तालुक्यात शेतकऱ्यांची पेरणीसाठी लगबग; सोयाबीन लावण्याची तयारी

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed