• Sat. Sep 21st, 2024

खवळलेला समुद्रात फोटो काढण्याची हौस, एक लाट अन्… मुंबईतील धडकी भरवणारा VIDEO

खवळलेला समुद्रात फोटो काढण्याची हौस, एक लाट अन्… मुंबईतील धडकी भरवणारा VIDEO

मुंबई: पाणी हे जीवन आहे हे तर आपल्याला माहितच आहे. पण, जर पाण्याशी खेळ केला तर तो विनाशही करु शकतो. पण, समुद्रकिनारी जाताना काळजी घ्या, असं वारंवार सांगूनही अनेकजण या सूचनेकडे दुर्लक्ष करतात आणि मग त्यांच्यासोबत अघटित घडतं. असाच एक व्हिडिओ सध्या समोर आला आहे. मुंबईतील वांद्रे येथील बँडस्टँडवर एक जोडपं कुटुंबासोबत एन्जॉय करत होतं, मात्र काहीच क्षणात त्यांच्या आनंदावर विरजण पडलं.

एक जोडपं बँडस्टँडवरील दगडावर बसून समुद्राच्या लाटांचा आनंद घेत होते. त्यांची चिमुरडी त्यांचा व्हिडिओ बनवत होती. व्हिडिओमध्ये मुलीचा आवाज स्पष्टपणे ऐकू येत होता. समुद्राच्या मोठ्या लाटा उठत होत्या, पती-पत्नी एकमेकांना धरून होते. लाटांचा आनंद घेत होते. मुलगी त्यांना म्हणत होती की परत या. पण, ते काही ऐकले नाही. यानंतर एक जोरदार लाट येते आणि ती महिला पतीसह वाहून जाते. व्हिडिओमध्ये ‘मम्मी-मम्मी…’ अशी ओरडणाऱ्या मुलीचा घाबरलेला आवाज स्पष्टपणे ऐकू येत आहे. ज्योती सोनार (३२) असे या महिलेचे नाव आहे.

क्रिकेट खेळताना अचानक कोसळला अन् २० वर्षांच्या पर्वची चटका लावणारी एग्झिट
महिलेचा पती मुकेश हा गौतम नगर, रबाळे, मुंबई येथे राहणारा असून एका खासगी कंपनीत टेक्निशियन म्हणून काम करतो. तो म्हणाला, “मी तिला वाचवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला. जेव्हा चौथी लाट आम्हाला मागून धडकली तेव्हा माझा तोल गेला आणि आम्ही दोघेही घसरलो. मी माझ्या बायकोची साडी पकडली तेव्हा एका माणसाने माझा पाय धरला, पण मी तिला वाचवू शकलो नाही.

तो पुढे म्हणाला, “मी तिला घट्ट पकडलं होतं पण, ती साडीमधून घसरली आणि माझ्या डोळ्यासमोर समुद्रात ओढली गेली. माझी मुलं तिथे होती. त्यांनी मदतीसाठी आरडाओरडा केला मात्र कोणीही काहीही करू शकले नाही.”

सायंकाळी ५.१२ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. उपस्थित लोकांनी पोलिसांना माहिती दिली. अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांसह पोलीस घटनास्थळी पोहोचले. मुंबई अग्निशमन दलाच्या शोध मोहिमेनंतर रविवारी रात्री उशिरा ज्योतीचा मृतदेह सापडला. त्यांना रुग्णालयात नेण्यात आले, मात्र तेथे पोहोचताच त्यांना मृत घोषित करण्यात आले.

शेतात काम करताना खजिना सापडला, एका क्षणात त्याच्या आयुष्याचं ‘सोनं’ झालं!
सहकुटुंब सहलीला गेले होते

हे जोडपं आणि त्यांची १२ वर्षांची मुलगी आणि ६ आणि ८ वर्षांची मुलं अनेकदा पिकनिकला जात असतात. रविवारी कुटुंबाने जुहू चौपाटीवर जाण्याचे ठरवले होते. मात्र, भरती-ओहोटीमुळे समुद्रकिनाऱ्यावर प्रवेश बंदी असल्याने कुटुंबीयांनी भेलपुरी सेंटरमध्ये जेवण करून वांद्र्याच्या दिशेने निघाले. तिथे फोटो काढत असताना हा धोकादायक दुर्घटना घडली.

बिपरजॉय चक्रीवादळामुळे गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्याला फटका; दुकानांमध्ये पाणी शिरलं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed