रत्नागिरी : खेळण्यासाठी गेलेल्या एका सोळा वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. महमद युनुस चाँद साली (वय १६ वर्षे, मूळ रा. तेनहल्ली जि. विजापूर, कर्नाटक, सध्या रा. शेट्येनगर, रत्नागिरी) असे मृत्यू झालेल्या मूलाचे नाव आहे. ही घटना रत्नागिरी शहर परिसरात शनिवारी दुपारच्या सुमारास घडली. शनिवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास महंमद हा आपल्या आईला मी मिरकरवाडा येथे खेळण्यासाठी जात असल्याचे सांगून तो घरातून बाहेर पडला होता. मात्र तो पुन्हा परतलाच नाही. शहरातील मिरकरवाडा येथे खेळताना विहिरीत पडून या अल्पवयीन मुलाचा बुडून मृत्यू झाला.
महंमद घरी न परतल्याने कुटुंबीय चिंतेत होते. त्यांनी मित्रमंडळी आणि नातवाईकांकडे महंमदची चौकशी केली. दरम्यान, शनिवारी दुपारी सव्वातीन वाजता महंमदच्या आईच्या चुलत्याने महंमदच्या वडिलाना फोन करुन महंमद मिरकरवाडा येथील विहिरीमध्ये पडल्याचे सांगितले.

महमदच्या आईने तातडीने त्याठिकाणी जाउन उपचारासाठी महमदला जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल केले. मात्र तेव्हा फारच उशीर झाला होता. तेथील वैद्यकिय अधिकार्यांनी त्याला तपासून मृत घोषित केले.
याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असुन अधिक तपास रत्नागिरी पोलीस करत आहेत.