नागपूर : नागपूरमधील एक संतापजनक घटना घडली आहे. येथील एका ६५ वर्षीय वासनांध वृद्ध व्यक्ती इतक्या खालच्या पातळीवर गेली की, त्याने आपल्या नातीच्या वयाच्या शेजारी राहणाऱ्या १० वर्षीय मुलीवर बलात्कार केला. दरम्यान, शेजाऱ्याची नजर त्याच्यावर पडल्याने ही घटना उघडकीस आली. त्यामुळे परिसरात संतापाचे वातावरण आहे. या प्रकरणी पीडितेच्या आईच्या तक्रारीच्या आधारे यशोधरानगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली.
मोहम्मद इद्रीस शेख (वय ६५ वर्षे) असे आरोपीचे नाव असून तो यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहतो. इद्रिस घरी सूत काततो. त्याला एक मुलगा आणि सूनही आहे. त्याचा मुलगा फळविक्रेता आहे. तो काही काळापासून भाड्याच्या घरात राहत होता. घरमालकाशी त्याची चांगली ओळख होती आणि त्याचा गैरफायदा घेतला. घरमालकाच्या १० वर्षांच्या मुलीशी त्याचे नेहमीच जवळीक होते. ती त्याचा नातीच्या वयाची असल्याने कोणालाही संशय आला नाही.

मंगळवारी रात्री ९.३० वाजता त्याने मुलीला फिरायला नेण्याच्या बहाण्याने गच्चीवर नेले आणि तेथे तिच्यावर बलात्कार केला. तो हे घाणेरडे कृत्य करत असताना घरातील दुसऱ्या भाडेकरूने त्याला पाहिले. दुसऱ्या भाडेकरूला पाहताच तो घाबरला आणि आरोपीने तेथून पळ काढला. याबाबत दुसऱ्या भाडेकरूने घरमालकाला याची माहिती दिली. घरमालकाने मुलीला विचारणा केली असता तिने रडत आपल्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे सांगितले.
अखेर तिच्या पालकांनी यशोधरानगर पोलीस ठाणे गाठले. मुलीचा पालकांकडून यशोधरानगर पोलिसात तक्रार करण्यात आली. पोक्सो कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून पोलिसांनी आरोपीला अटक केली. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. इद्रिसबद्दल स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.