• Mon. Nov 25th, 2024

    एकनाथ शिंदेंच्या शिलेदारानं शड्डू ठोकला, नवनीत राणांचं टेन्शन वाढलं, अमरावतीत केली मोठी घोषणा

    एकनाथ शिंदेंच्या शिलेदारानं शड्डू ठोकला, नवनीत राणांचं टेन्शन वाढलं, अमरावतीत केली मोठी घोषणा

    म. टा. वृत्तसेवा, अमरावती : अमरावती लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. या मतदारसंघात माजी खासदार आनंदराव अडसूळ अथवा आपण स्वत: आगामी लोकसभा निवडणूक लढविणार, असा दावा शिवसेनेचे माजी आमदार अभिजित अडसूळ यांनी केला. भाजप-शिवसेना-राष्ट्रवादीची युती झाल्यानंतर हा दावा करण्यात आल्याने खासदार नवनीत राणा यांची वाट बिकट होण्याचा धोका व्यक्त आहे.

    माजी आमदार अडसूळ यांनी शुक्रवारी शासकीय विश्रामगृहावर पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, अमरावती लोकसभा शिवसेनेच्या हक्काची जागा आहे. त्यामुळे राज्यातील समीकरण बदलले असले तरी या जागेवर परिणाम होणार नाही. या जागेवर कोण निवडून आले यापेक्षा पुढील काळात चर्चा करून आम्ही जागा निश्चित मागणार आहोत. याठिकाणी आपले वडील अथवा आपण निवडणूक लढणार आणि जिंकणार असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. अमरावती जिल्ह्यातून आम्ही निवडणूक लढवावी यासाठी नागरिक फोन करीत असल्याचेही त्यांनी सांगितले. शिवसेनेच्या ठाकरे गटावरही त्यांनी टीका केली.
    Ravindra Mahajani Death : रवींद्र महाजनी बुडालेले कर्जात, १५ व्या वर्षी मुलगा गश्मीरने ‘हे’ काम करुन सावरलेलं कुटुंब
    माजी खासदार आनंदराव अडसूळ हे ७० दिवस रुग्णालयात होते. पण, उद्धव ठाकरे यांनी साधी विचारपूसही केली नाही. चौकशी सुरू असताना पक्षाने कुठलेही सहकार्य केले नव्हते, असा आरोपही केला. पत्रपरिषदेला शिवसेना जिल्हाप्रमुख अरूण पडोळे, गोपाल अरबट, महानगर प्रमुख संतोष बद्रे उपस्थित होते.

    ‘अर्थ खाते पवारांकडे असले तरी फरक नाही’

    अमरावतीचे अनेक दौरे केले आहेत. कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी संपर्क कायम ठेवला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे अर्थ खाते असले तरी त्याचा आमच्या शिवसेनेला काहीही फरक पडणार नाही. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना शिवसेना आमदारांकडे दुर्लक्ष झाले. परंतु आता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असल्याने कुणालाही त्रास होणार नाही, असा विश्वासही अभिजित अडसूळ यांनी व्यक्त केला.
    गोगावले-शिरसाट सांगते राहिले पण ते घडलंच नाही, मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर; मुहूर्त का हुकला, कारण समोर

    राणांच्या भूमिकेकडे लक्ष

    अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि बडनेऱ्याचे आमदार रवी राणा आता अभिजित अडसूळ यांच्या भूमिकेवर काय भाष्य करणार, कोणती भूमिका घेणार याकडे लक्ष लागलं आहे.

    Ravindra Mahajani : ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी यांचं पुण्यातील घरी निधन, मराठी सिनेसृष्टीवर शोककळा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed