• Sat. Sep 21st, 2024
Pune News: पुणेकर! तक्रार करा, बक्षीस मिळवा; PMPMLच्या नव्या अध्यक्षांची योजना; वाचा सविस्तर…

पुणे : बेशिस्त चालक व वाहकांविरोधात पुराव्यानिशी एखाद्या प्रवाशाने तक्रार केल्यास त्याला शंभर रुपये बक्षीस दिले जाणार आहे. त्याचवेळी चालक व वाहकावर एक हजार रुपयांची दंडात्मक कारवाईही केली जाणार आहे. चालक व वाहकांच्या वर्तनात सुधारणा होण्यासाठी ‘पीएमपीएमल’च्या नव्या अध्यक्षांनी ही योजना सुरू केली आहे.

पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमल) चालक आणि वाहकांच्या बेशिस्त वर्तनाबाबत नागरिक, सामाजिक संस्था, प्रवासी यांच्याकडून मोठ्या प्रमाणात तक्रारी येत आहेत. या तक्रारीमध्ये प्रामुख्याने चालकाचे मोबाइलवर बोलणे, बसवर मार्गाचा फलक नसणे, चुकीचे फलक लावणे, झेब्रा क्रॉसिंगवर बस थांबविणे अशा स्वरूपाच्या तक्रारी असतात. चालक व वाहकांच्या वर्तनात फरक पडावा आणि प्रवाशांना चांगली सेवा मिळावी म्हणून ‘पीएमपीएमल’कडून ‘बक्षिस योजना’ सुरू करण्यात आली आहे.

Thackeray : शिंदे गटाला धक्का, ठाकरे गटानं बाजी मारली, आपलाच आदेश मागं घेण्याची पोलिसांवर नामुष्की, काय घडलं?
त्यामध्ये बेशिस्त वर्तन करणाऱ्या चालक व वाहकांविरोधात पुराव्यानिशी एखाद्या प्रवाशाने तक्रार केल्यास त्याला शंभर रुपयांचे बक्षिस दिले जाणार आहे. आलेल्या तक्रारीची आणि पुराव्याची शहानिशा केली जाईल. त्यानंतर प्रवाशाला बक्षिस दिले जाईल; तसेच संबंधित चालक अथवा वाहकाला एक हजार रुपये दंड केला जाणार आहे. दंडाची रक्कम संबंधितांच्या पगारातून वसूल केली जाईल. त्यामुळे चालक आणि वाहकांनी नियमांचे पालन करावे. प्रवाशांना चांगली सेवा द्यावी, असे आवाहन पीएमपीएमलकडून करण्यात आलं आहे.

अशी करा तक्रार…

प्रवाशांनी तक्रार करताना फोटो, व्हिडीओ, बस क्रमांक, मार्ग क्रमांक, ठिकाण, तारीख, वेळ अशी माहिती पीएमपीएमलच्या [email protected] या ई-मेलवरत पाठवावी. त्याचबरोबर ९८८१४९५५८९ या व्हॉट्सअॅप क्रमांकावरदेखील तक्रार करता येईल. प्रवासी जवळच्या डेपोमध्येही पुराव्यानिशी तक्रार करू शकतात.

Mumbai News: पादचारी अन् नागरिकांची कसरत थांबणार, सायन पादचारी पूलाबाबत मोठी अपडेट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed