• Sat. Sep 21st, 2024

मुख्यमंत्र्यांसोबत बैठक मात्र आदेशावर सहीच नाही; दोन हजार धरणग्रस्त करणार कोयनेकाठी आमरण उपोषण

मुख्यमंत्र्यांसोबत बैठक मात्र आदेशावर सहीच नाही; दोन हजार धरणग्रस्त करणार कोयनेकाठी आमरण उपोषण

सातारा : सत्तेत असलेले सर्व राजकारणी सत्तेच्या साठमारीत आंधळे होऊन ओढाओढीत आकंठ बुडालेले आहेत. जनतेच्या जिव्हाळ्याचा मुद्यांची त्यांना आठवण सुद्धा राहिलेली नाही. अशा परिस्थितीत आमरण उपोषणासारखा लढा करून आम्ही मेलो तरी त्याची दखल घेण्याचे भान त्यांना असणार नाही, अशी टीका श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी सांगितले.

पाटण येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.डॉ. भारत पाटणकर म्हणाले, महाराष्ट्रात कुठलाही लढा चालू असला तरी सत्तेत असलेले आणि नवीन गेलेल्यांमध्ये मंत्रीपदांसाठी चढाओढ सुरू आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात राजकारण आणि सत्ताकारण एवढ्या निंदनीय थराला कधीच गेले नव्हते. इतके भयंकर कधी घडले नव्हते. गेल्या चार दिवसांत राजकारणी इकडून तिकडे पक्ष बदलत आहेत. जनतेशी त्यांना देणे- घेणे नाही, असे दिसत आहे. यामध्ये जनता पूर्णपणे बाजूला आहे. या साठमारीत त्यांना जनतेचे भान नाही. त्यांना सत्तेशिवाय काही आठवत नाही. तसेच या नेत्यांना जनतेची व त्यांच्या प्रश्नांची शुद्ध नाही. त्यामुळे या परिस्थितीमुळे दि. १९ जुलैपासून सुरू होणारे धरणग्रस्तांचे उपोषण दहा दिवस पुढे ढकलून येत्या २७ जुलैपासून कोयना जलाशयाच्या काठावर कोणत्याही परिस्थितीत सुरू होणार असून त्यास व्यापक स्वरूप देणार असल्याचे पाटणकरांनी स्पष्ट केले.

आम्ही मेल्यावर सरकार जमिन देणार का? भाकरी-तुकडा घेऊन आजी आंदोलनात, धरणग्रस्तांचे मनोबल वाढवतेय ७५ वर्षीय वाघीण

या उपोषणात कोयना, तारळी, वांग, उरमोडी, चांदोली या प्रकल्पातील सुमारे दोन हजार धरणग्रस्त सहभागी होणार आहेत. आजपर्यंत अनेक सरकारी अधिकारी आले आणि गेले. मग ती कोणत्याही पक्षाचे असो असे कधीही घडले नाही ही स्थिती फारच गंभीर आहे. मतदारांमध्ये ९५ टक्के मतदार गोरगरीब- शोषित आहेत. त्यांच्या मतांवर निवडून आल्यानंतर अशा तऱ्हेने त्यांच्याशी वागणे हे महाभयंकर आहे.

मुख्यमंत्र्यांसोबत दरे येथे झालेल्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेण्यात आले. मात्र, त्याचे पुढे काही झाले नाही. घेतलेल्या निर्णयाच्या आदेशावर मुख्यमंत्र्यांची सही झाली नाही. प्रधान सचिव व उच्च अधिकार समितीची सुद्धा बैठका झाल्या. मात्र, त्यामध्ये सुद्धा घेतलेल्या निर्णयावर पुढे आदेश होऊन सह्या झाल्या नाहीत, अशी परिस्थिती पूर्वी कधी घडली नव्हती. मग सरकार कोणाचेही असू दे प्रशासनाला बाजूला ठेवून अंतिम निर्णय झाले नाहीत. झालेल्या आदेशावर मुख्यमंत्र्याची मात्र सही झाली नाही यामुळे सर्व जिल्हाधिकारी गप्प आहेत.

पोलीस भरतीला खोटी कागदपत्रे, खोट्या आरक्षणाच्या लाभातून निवड यादीमध्ये स्थान; असा अडकला पोलिसांच्या जाळ्यात
कोयना धरण उच्चस्तरीय समितीच्या बैठकीच्या अगोदरच जमिनी पसंती सांगली व सातारा जिल्ह्यात झाल्या आहेत. अशा सुमारे ८०० च्या दरम्यान खातेदारांनी अर्ज केले आहेत, त्याचे पुढे काय करणार?असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. यासाठी येत्या २७ जुलैपासून कोयना शिवसागर जलाशयालगत आपण धरणग्रस्तांसह उपोषणास बसणार असल्याचे डॉ. भारत पाटणकर यांनी शेवटी स्पष्ट केले.

तुम्ही निमंत्रणाशिवाय येणार नाही का?

कोयनेतील आंदोलनादरम्यान माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, खासदार श्रीनिवास पाटील, तत्कालीन पालकमंत्री बाळासाहेब पाटील, आमदार मकरंद पाटील या लोकप्रतिनिधींना भेटावयास वेळ मिळाला नाही, जे आले त्यांनी फक्त भेटी दिल्या, मग आम्ही तुमच्या सोबत कसे वागायचे ते सांगा? आम्ही मरायला लागलो तरी तुम्ही येणार नाही का? का तुम्ही निमंत्रणाशिवाय येणार नाही, अशी खंत डॉ. पाटणकर यांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed