• Sat. Sep 21st, 2024

मित्रपक्ष बेदखल, संधी मिळण्याच्या प्रतिक्षेत, सेना आमदारांची मंत्रिपदासाठी हमरीतुमरी!

मित्रपक्ष बेदखल, संधी मिळण्याच्या प्रतिक्षेत, सेना आमदारांची मंत्रिपदासाठी हमरीतुमरी!

कोल्हापूर : राज्याच्या नव्या राजकीय समीकरणात राष्ट्रवादी आणि शिवसेना हे दोन्ही ताकदीचे पक्ष भाजपच्या गोटात सहभागी झाले. त्यामुळे पूर्वीपासून कमळासोबत असणारे त्यांचे छोटे मित्र पक्ष मात्र बेदखल झाले आहेत. तीन प्रमुख पक्षातच मंत्री आणि महामंडळासाठी रस्सीखेच सुरू झाल्याने छोट्या पक्षांना आता केवळ ‘देखते रहो’ची भूमिका घ्यावी लागत आहे.

राज्यात २०१४ ते २०१९ या काळात भाजप सत्तेत असताना पाच वर्षे शिवसेनेसह जनसुराज्य शक्ती, स्वाभिमानी शेतकरी संघटना, राष्ट्रीय समाज पक्ष, शिवसंग्राम, रयत क्रांती संघटना आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट हे मित्रपक्ष होते. या सर्वांनाच सत्तेत मंत्रीपदासह महामंडळे मिळाली होती. पण महाविकास आघाडी सत्तेत आल्यानंतर भाजपचे मित्र पक्षाकडे दुर्लक्ष होऊ लागले. सत्ता नसल्याने हा दुर्लक्षपणा फारसा चर्चेत आला नाही. मात्र, राज्य पुन्हा ताब्यात येऊन वर्ष उलटले, तरीही दुर्लक्ष करण्याचा स्वभाव बदलला नसल्याचे समोर आल्याने या मित्र पक्षात नाराजीचे सूर उमटत आहेत.

आधी सुप्त संघर्ष-आता उघडपणे भिडणार, अजितदादा-जयंतराव एकमेकांना नडणार
छोटे मित्र पक्ष बेदखल

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला सोबत घेऊन भाजपचे नवीन सरकार स्थापन झाले. यामुळे जनसुराज्य, रासप, आरपीआय या पक्षांना मंत्रीपद, विधान परिषदेचे सदस्यत्व मिळेल अशी आशा निर्माण झाली. वर्षभर यातील काहीच झाले नाही. आता तर राष्ट्रवादी पक्षाचे तीस पेक्षा अधिक आमदार सत्तेत सहभागी झाले आहेत. त्यांच्यासह शिंदे गटाचे अनेक आमदार मंत्रीपद आणि महामंडळाच्या प्रतिक्षेत आहेत.

शरद पवारांसमोर खणखणीत भाषण, टाळ्यांचा कडकडाट, अमोल कोल्हेंचं UNCUT भाषण

मंत्रीपदे कमी आणि दावेदार अधिक

सध्या मंत्रीपदे कमी आणि दावेदार अधिक अशी अवस्था आहे. विस्तारात स्थान मिळेल म्ह्णून देव पाण्यात ठेऊन अनेकजण बसले आहेत. तशी चिन्हे दिसत नसल्याने नाराजीचा सूर वाढत आहे. मंत्रीपदासाठी भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षातच रस्सीखेच सुरू आहे. त्यांच्याकडे आमदारांची संख्या मोठी आहे. याच बळावर ते अधिकाधिक मंत्रिपदे पदरात पाडून घेण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

शिवसैनिकांचं कौतुक, अजितदादांच्या बंडावर पहिल्यांदाच उद्धव ठाकरेंचं पहिल्यांदाच भाष्य
भाजपला साथ देणाऱ्या घटक पक्षांची अवस्था दयनीय

या सर्व लढाईत भाजपला साथ देणाऱ्या घटक पक्षांची अवस्था दयनीय झाली आहे. मुळात या सर्वांकडे असलेल्या आमदारांची संख्या केवळ एक-दोन आहे. त्यामुळे ताकद नसलेल्या पक्षाला मंत्रीपद मिळण्याची शक्यता मावळली आहे. यातूनच रासपचे महादेव जानकर यांच्यासह अनेकजण उघडपणे आपली नाराजी व्यक्त करत आहेत. स्वाभिमानी संघटना पूर्वीच बाहेर पडली आहे. रासप त्याच मार्गावर आहे. ते राहिले काय आणि गेले काय? सध्याच्या राजकीय घडामोडीत त्याचा कोणताही परिणाम भाजपवर होण्याची शक्यता नसल्यानेच त्यांना बेदखल करण्यात येत असल्याचे चित्र आहे.

तुम्ही निवृत्त कधी होणार? अजितदादांच्या प्रश्नाला शरद पवारांचं ‘धडाकेबाज’ उत्तर
आमदारांची संख्या अधिक असलेले मित्रपक्ष मिळाल्याने कदाचित भाजप आमच्याकडे दुर्लक्ष करत असेल. पण कधी ना कधी आम्हाला त्यांच्याकडून न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे- सदाभाऊ खोत, अध्यक्ष, रयत क्रांती संघटना

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed