• Mon. Nov 25th, 2024

    पाणीपुरी खाल्ल्याने जम्मू-काश्मीरमधील नर्सिंगच्या विद्यार्थिनीचा मृत्यू, नागपुरात खळबळ

    पाणीपुरी खाल्ल्याने जम्मू-काश्मीरमधील नर्सिंगच्या विद्यार्थिनीचा मृत्यू, नागपुरात खळबळ

    नागपूर: रुग्णसेवेत करिअर करण्याचं स्वप्न पाहत आसलेल्या मेडिकल कॉलेजच्या बी.एस.सी नर्सिंगच्या १८ वर्षीय विद्यार्थिनीचा बुधवारी रात्री अचानक मृत्यू झाला. त्या विद्यार्थिनीने त्या दिवशी पाणीपुरी खाल्ली होती. काही तासांनंतर तीची प्रकृती बिघडली आणि गुरुवारी रात्री उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला आहे.

    मृत विद्यार्थिनीचे नाव शीतल कुमार असे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ३ जुलैच्या रात्री शीतलला उलट्या झाल्या. दुसऱ्यदिवशी ती आजारी पडली. त्रास कमी होत नसल्याचे पाहून तिने सकाळी मेडिकलच्या बाह्यरुग्ण विभागातील डॉक्टरांना दाखिविले. डॉक्टरांनी तिला अॅडमिट होण्यास सांगितले, मात्र तिने नकार दिला. डॉक्टरांनी सांगितलेले औषध घेऊन ती नर्सिंग हॉस्टेलमधील तिच्या खोलीत परतली. ५ जुलै रोजी तिला ताप आला. यामुळे ती पुन्हा बाह्यरुग्ण विभागात आली.

    अखेर एलियन्सच्या घराचा पत्ता सापडला, ‘या’ ग्रहावर आहे वास्तव्य, शास्त्रज्ञांच्या हाती मोठी माहिती
    डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर तिला वॉर्ड क्रमांक ४८ मध्ये दाखल करण्यात आले. तिची लक्षणे गॅस्ट्रोसारखी होती. त्यानुसार उपचार सुरू करण्यात आले. त्याच दिवशी शीतलची प्रकृती अधिकच बिघडली. तिला तातडीने आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, रात्री बाराच्या सुमारास तिचा मृत्यू झाला. या घटनेमुळे तिला पाणीपुरीतुन विषबाधा झाली का? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.

    मूळची जम्मू-काश्मीरमधील असलेल्या या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला असून महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी प्राथमिक माहितीला दुजोरा देताना सांगितले की, पाणीपुरी खाल्ल्यानंतर तिची प्रकृती बिघडली.

    वडील म्हणाले ऑल द बेस्ट, काहीच वेळात १५ वर्षांच्या पोराच्या मृत्यूची बातमी आली, मन सुन्न करणारी कहाणी
    शीतलच्या रूममेटने तिचा मृतदेह पाहिल्यावर तिला धक्काच बसला. तिला तातडीने वॉर्ड क्र. ५१ मध्ये ‘आयसीयूत’दाखल करण्यात आले आणखी एका मैत्रिणीलाही शीतल सारखी लक्षणे दिसल्यानंतर तिलाही आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. भरती असलेल्या दोन्ही विद्यार्थिनींची प्रकृती स्थिर आहे. प्रकृती बिघडण्यापूर्वी शीतलने पाणीपुरी खाल्ल्याचे सांगण्यात येत आहे.

    समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; एका ड्रायव्हरचा दुर्दैवी मृत्यू, दुसरा ड्रायव्हर सुदैवाने वाचला

    मृत्यूच्या एका दिवसाआधी शीतलने तिच्या मैत्रिणीला सांगितले होते की, आदल्या दिवशी तिच्या लघवीत रक्त आले होते. त्याच मैत्रिणीलाही लघवीतून रक्त गेल्याने तिच्या मैत्रिणीलाही भरती करण्यात आले आहे. शीतलचा मृत्यू गॅस्ट्रोने, डेंग्यूने की अन्य कोणत्या कारणाने झाला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. शवविच्छेदनानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होईल, असे सांगण्यात येत आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed