• Sat. Sep 21st, 2024
अजितदादा उपमुख्यमंत्री होताच पहिली कॅबिनेट बैठक, आठ महत्त्वाच्या निर्णयांचा धडाका

मुंबई : अजित पवार यांनी सत्तेत सहभाग घेत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर अवघ्या ४८ तासातच राज्यमंत्रिमंडळाची पहिली बैठक पार पडली. यावेळी कॅबिनेट आठ महत्त्वाचे निर्णय घेतले. राज्याचे ग्रीन हायड्रोजन धोरण जाहीर करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. तर मराठा, कुणबी विद्यार्थ्यांना परदेशी उच्च शिक्षणासाठी सयाजीराव गायकवाड – सारथी शिष्यवृत्ती योजना जाहीर करण्यात आली.

राज्य शासनाला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने वर्षभरातील महत्त्वाच्या निर्णयांचा आढावा घेणाऱ्या पहिले वर्ष सुराज्याचे या पुस्तिकेचे आणि लोकराज्य मासिकाच्या विशेषांकाचे आज प्रकाशन करण्यात आले. मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या हस्ते हे प्रकाशन झाले. यावेळी मंत्रिमंडळातील सर्व सदस्य उपस्थित होते.

उपरोधाची बाब म्हणजे सरकारच्या पहिल्या वर्षात जे अजित पवार विरोधीपक्ष नेते म्हणून शिंदे-फडणवीस सरकारवर टीकेची झोड उठवत होते, आता तेच सत्तेत सहभागी होऊन उपमुख्यमंत्रिपदी विराजमान झाले आहेत. याशिवाय त्यांच्याच हस्ते वर्षभरातील महत्त्वाच्या निर्णयांचा आढावा घेणारे ‘पहिले वर्ष सुराज्याचे’ या पुस्तकाचेही त्यांच्याच हस्ते प्रकाशन झाले.

राज्यमंत्रिमंडळाच्या बैठकीत कोणकोणते निर्णय?

* राज्याचे ग्रीन हायड्रोजन धोरण जाहीर. देशातील महाराष्ट्र हे पहिले राज्य. नवीकरणीय ऊर्जा प्रकल्पांना मोठे प्रोत्साहन

( ऊर्जा विभाग)

* मराठा, कुणबी विद्यार्थ्यांना परदेशी उच्च शिक्षणासाठी सयाजीराव गायकवाड – सारथी शिष्यवृत्ती योजना. ७५ विद्यार्थ्यांना दरवर्षी शिष्यवृत्ती

(नियोजन विभाग)

अजित पवारांच्या एन्ट्रीने विचका, मंत्रिपदाची ठाम खात्री असलेल्या भरत गोगावलेंचा सूर बदलला, म्हणाले…

• दिंडोरी तालुक्यातील चिमणपाडा आणि त्र्यंबक तालुक्यातील कळमुस्ते येथील प्रवाही वळण योजनांना मान्यता

(जलसंपदा विभाग)

• नागपूर येथील मे.शिवराज फाईन आर्ट लिथो वर्क्सच्या कर्मचाऱ्यांना शासन सेवेत सामावून घेणार

(उद्योग विभाग)

Ajit Pawar :पटेलांच्या घरी प्लॅन,दादांची ऑफर, शरद पवारांकडून रिजेक्ट, जाणून घ्या बंडाची EXCLUSIVE स्टोरी

• सेवानिवृत्त मुख्य न्यायमूर्ती, न्यायमूर्ती किंवा त्यांचे पती, पत्नी यांना सेवानिवृत्तीनंतरचे लाभ

(विधि व न्याय विभाग)

• सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली, गेळे आणि चौकुळ येथील कबूलायतदार गावकर जमिनीबाबत निर्णय.

(महसूल विभाग)

दादा कुटुंबातले म्हणून जास्त बोलत नाही, पण पवारसाहेबांनी असं काय कमी केलं होतं?; रोहित पवारांचा संतप्त सवाल

• नागपूर कृषि महाविद्यालय येथे आंतरराष्ट्रीय कृषि सुविधा केंद्र

(कृषि विभाग)

मनसैनिक-शिवसैनिकांची ‘युती’; साहेब आता तरी एकत्र या… ठाकरे बंधू समर्थकांचं एकत्रित बॅनर
• मत्स्यबीज उत्पादन आणि मत्स्यबीज संवर्धन केंद्रांचा भाडेपट्टी कालावधी वाढवून आता २५ वर्षे

(पदुम विभाग)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed