पालघर: अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना बोईसर परिसरात घडली आहे. अल्पवयीन मुलगी बिर्याणीच्या दुकानात बिर्याणी आणण्यासाठी गेली असता या बिर्याणी दुकानदाराने तिचा विनयभंग केला. याप्रकरणी आरोपी विरोधात बोईसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पालघर तालुक्यातील बोईसर परिसरात दहा वर्षाची अल्पवयीन मुलगी वास्तव्यास आहे. दरम्यान अल्पवयीन मुलगी, तिची बहिण आणि शेजारची एक मुलगी अशा तीन जणी बोईसर येथील एका बिर्याणीच्या दुकानात बिर्याणी आणण्यासाठी गुरुवारी सायंकाळच्या सुमारास गेल्या होत्या. बिर्याणीच्या दुकानात गेल्यानंतर बिर्याणी दुकानदाराने तिची लहान बहीण आणि शेजारच्या मुलीला बिर्याणीच्या दुकानासमोर असलेल्या एका दुकानात खाऊ आणण्यासाठी पाठवले. त्या दोघी जणी दुसऱ्या दुकानात गेल्यानंतर बिर्याणी दुकानदाराने दहा वर्षीय अल्पवयीन मुलीचा हात धरून तिला दुकानाच्या आत नेले. त्यानंतर तिच्यासोबत अश्लील चाळे केले. मुलीने विरोध केल्यानंतर दुकानदाराने तिचा हात सोडून दिला.

याच दरम्यान दुकानात गेलेल्या दोघी जणी बिर्याणीच्या दुकानात परतल्या. त्यानंतर दुकानदाराने या तिघींना बिर्याणीचे पाकीट दिले. त्यानंतर तिन्ही मुली आपल्या घरी परत आल्या. मात्र घरी परतल्यानंतर दहा वर्षाची अल्पवयीन मुलगी जोरजोराने रडू लागली. तिच्या आईने तिला विचारल्यानंतर बिर्याणीच्या दुकानात घडलेला सर्व प्रकार तिने आईला सांगितला. आपल्या मुलीसोबत घडलेला हा धक्कादायक प्रकार कळल्यानंतर मुलीच्या आई-वडिलांनी व कुटुंबीयांनी थेट बोईसर एमआयडीसी पोलीस ठाणे गाठले व आरोपी बिर्याणी दुकानदाराविरोधात तक्रार दाखल केली. याप्रकरणी आरोपी बिर्याणी विक्रेत्या विरोधात पोक्सोसह भादविस 354 कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी बिर्याणी विक्रेत्याला बोईसर पोलिसांनी अटक केली आहे.