नागपूर : मित्रासोबत फिरायला आलेल्या तरुणाचा तलावात बुडून मृत्यू झाला. तलावात पोहण्यासाठी उतरल्यानंतर तरुणांनी पाण्यात मस्ती करण्यास सुरुवात केली. यामध्ये एका तरुणाचा खोल पाण्यात जाऊन बुडून मृत्यू झाला. ही घटना बुधवारी सायंकाळी हिंगणा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बोरगाव येथील शिवारा तलावात घडली. गुरुवारी सकाळी या तरुणाचा मृतदेह पाण्याबाहेर आढळून आला काढून घेतले. पवन दिलीप गुंडावार (२१, रा. नंदनवन, दर्शन कॉलनी) असे मृताचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच हिंगणा पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह तलावातून बाहेर काढला.
मिळालेल्या माहितीनुसार, पवन हा मित्रासोबत हिंगणा येथील बोरगाव येथील तलावाजवळ फिरायला गेला होता. सायंकाळी सहाच्या सुमारास सर्वजण पोहण्यासाठी तलावात उतरले. पाण्यात कुरघोडी करत असताना पवन खोल पाण्यात गेला. पवन आंघोळीसाठी तलावात गेला असता, त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडू लागला. तो बुडाताच त्याच्या मित्रांमध्ये आरडाओरडा झाला. मित्राने त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत तो तरुण पाण्यात बुडाला.

याबाबत मित्राने पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच सहाय्यक हवालदार वसंत शेडमाके, हवालदार विनायक मुंडे सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले आणि एमआयडीसी अग्निशमन दलाच्या जवानांच्या मदतीने पवनचा पाण्यात शोध घेतला.
बुधवारी सायंकाळी अंधारामुळे मागे घेण्यात आलेली शोध मोहीम गुरुवारी सकाळी पुन्हा सुरू करण्यात आली. सकाळी नऊच्या सुमारास अग्निशमन दलाच्या जवानांनी पवनचा मृतदेह पाण्याबाहेर काढला. पोस्टमॉर्टमनंतर मृतदेह त्याच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. दिलीप गुंडावार यांच्या फिर्यादीवरून हिंगणा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.