भारतीय हवामान विभागानं २६ ते २८ जूनपर्यंतचे अंदाज जारी केले आहेत. त्यानुसार २६ जूनला रायगड, रत्नागिरी, पुणे आणि विदर्भात नागपूर, गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यांना ऑरेंज अॅलर्ट जारी करण्यात आला आहे. तर, मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक, सातारा, कोल्हापूर , सिंधुदुर्ग, परभणी, हिंगोली, नांदेड, चंद्रपूर आणि गडचिरोलीला यलो अॅलर्ट जारी करण्यात आला आहे.
२७ जूनला कशी असेल पावसाची स्थिती ?
भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार २७ जून रोजी राज्यातील पावसाचा जोर वाढणार आहे. पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, पुणे, रत्नागिरी, अमरावती आणि नागपूर जिल्ह्यांना ऑरेंज अॅलर्ट जारी करण्यात आला आहे. तर, सातारा, सिंधुदुर्ग, नाशिक, नंदुरबार, चंद्रपूर आणि गोंदिया जिल्ह्यांना यलो अॅलर्ट जारी करण्यात आला आहे. याशिवाय उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस होऊ शकतो.
२८ जूनला विदर्भात पावसाचा जोर कमी
हवामान विभागानं जारी केलेल्या अॅलर्टनुसार २८ जूनला पालघर, मुंबई, ठाणे, पुणे, रत्नागिरी आणि रायगड, नाशिक जिल्ह्यात पावसाचा जोर अधिक राहील. या जिल्ह्यांना ऑरेंज अॅलर्ट देण्यात आला आहे. तर, रत्नागिरी, सातारा, अमरावती, वर्धा आणि नागपूरला यलो अॅलर्ट देण्यात आला आहे. तर, मराठवाड्यासह उत्तर महाराष्ट्रात तुरळक पाऊस होऊ शकतो.
दरम्यान, भारतीय हवामान विभागानं जारी केलेल्या ताज्या अंदाजानुसार येत्या तीन ते चार तासात मुंबई, रायगडमध्ये जोरदार पाऊस होऊ शकतो. याशिवाय ठाणे, पुणे, पालघर, अहमदगनर, सोलापूर, सातारा, बीड आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील पाऊस होऊ शकतो. याशिवाय वारे देखील वेगात वाहू शकतात.