• Mon. Nov 25th, 2024
    पुणे-सोलापूर महामार्गावर तिहेरी अपघात; दोघांची प्रकृती गंभीर

    Accident News: पुणे-सोलापूर महामार्गावर तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला आहे. यात २ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना कस्तुरी प्रतिष्ठान, लाईफ केअर रुग्णवाहिकेच्या मदतीने उरुळी कांचन येथील गणराज हॉस्पिटल, सिध्दीविनायक हॉस्पिटल, झेड प्लस हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

     

    पुणे अपघात

    हायलाइट्स:

    • पुणे-सोलापूर महामार्गावर तिहेरी अपघात
    • २ जण गंभीर जखमी
    • अपघातानंतर वाहतूक कोंडी
    पुणे : पुणे-सोलापूर महामार्गावरील खेडेकर मळा परिसरात आयशर टेम्पो, चारचाकी कार आणि दुचाकी यांचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात २ गंभीर जखमी झाले असून ७ जण किरकोळ जखमी झाले आहेत. हि घटना आज दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या अपघातानंतर वाहतूक कोंडी झाली असून सुरळीत करण्याचे काम सुरू आहे.
    वाऱ्याच्या वेगानं वाहन पळवलं, ताबा सुटताच कंटेनरची रिक्षाला जोरदार धडक; दोघांचा जागीच अंत
    टेम्पो हा पुणे बाजूकडे निघाला असल्याची माहिती समोर आली असून चारचाकी गाडी हि सोलापूरच्या दिशेने निघाली होती. टेम्पोमध्ये बांधकामाच्या लोखंडी प्लेट होत्या. टेम्पो चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि सोलापूरच्या बाजूने निघालेल्या चारचाकी गाडीवर जाऊन आदळला. तसेच बाजूने जाणाऱ्या एका दुचाकीलाही ठोकरले. अपघातग्रस्त व्यक्तींना कस्तुरी प्रतिष्ठान, लाईफ केअर रुग्णवाहिकेच्या मदतीने उरुळी कांचन येथील गणराज हॉस्पिटल, सिध्दीविनायक हॉस्पिटल, झेड प्लस हॉस्पिटल या ठिकाणी उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

    भयानक अपघात! ट्रकच्या धडकेत एसटीच्या समोरील भागाचा चुराडा

    अपघात एवढा भीषण होता की, टेम्पो हा चारचाकी गाडीच्या बोनेटवर जाऊन थांबला. यावेळी गाडीत असलेल्या पती -पत्नी आणि त्यांच्या दोन मुलांना किरकोळ जखम झाली आहे. तर टेम्पोतील दोघेजण गंभीर जखमी झाले असून दुचाकीवरील व्यक्ती जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. पुणे-सोलापूर महामार्गावर अपघाताचे प्रमाण वाढले आहे. वाहनांवरील अतिवेग हे अपघाताचे महत्वाचे कारण होत असून चालकांनी वाहने नियंत्रणात चालवण्याची आवश्यकता असल्याचे मत जाणकारांनी व्यक्त केले आहे. आजच्या अपघाताने वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. जखमींवर तातडीने उपचार सुरू करण्यात आले असून त्यांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे.

    जवळच्या शहरातील बातम्या

    Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed