• Sat. Sep 21st, 2024
मुंबई, पुण्यात मान्सून आणखी लांबला, हवामान खात्याने दिली नवी तारीख; येलो अलर्टही जारी

मुंबई : यंदाचा मान्सून केरळमध्ये उशिरा दाखल झाला. पण यानंतर पावसानं सगळ्याच राज्यांमध्ये लेटमार्क लावला. आज महाराष्ट्राच्या विदर्भामध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर आता मुंबई पुण्यात पावसाच्या सरी बरसतील अशी आशा होती. पण मुंबई आणि पुणेकरांना मात्र पावसाची आणखी वाट बघावी लागणार आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, २५ जूननंतर शहरांमध्ये मान्सून सक्रिय होईल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.कोकणात रखडलेल्या मान्सूनने आज विदर्भात जोरदार हजेरी लावली. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये मात्र पाऊस सावकाश पुढे सरकेल अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. खरंतर, राज्यात ७ जून रोजी मान्सून दाखल होतो. पण यंदा मात्र ११ जूनपासून तो लांबणीवर आहे. चक्रीवादळामुळे मान्सूनचा प्रवाह थांबला होता. परंतु, आता मान्सूनची प्रगती सुरू झाली आहे. पण असं असलं तरी मान्सून मुंबई आणि पुण्यात दाखल होण्यासाठी आणखी २ दिवस घेणार आहे.

Monsoon Update : मान्सून आला रे, महाराष्ट्राच्या या भागांत आज बरसला, पुढे कुठल्या शहरांना अलर्ट? वाचा वेदर रिपोर्ट
भारतीय हवामानशास्त्र पुणे विभागाचे प्रमुख के. एस होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, विदर्भाच्या काही भागांमध्ये आज मान्सूनने हजेरी लावली. यामुळे अमरावती, चंद्रपूर आणि इतर जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी तुरळक तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस पाहायला मिळाला. यामुळे पावसाची वाट बघणारा बळीराजा मात्र सुखावला आहे. अशात हवामान खात्याकडून २५ तारखेपासून पुणे, कोल्हापूर, सातारा आणि नाशिकच्या घाट परिसरामध्ये येलो अलर्ट दिला आला तर २७ जूननंतर घाट परिसरामध्ये ऑरेंज अलर्ट असेल अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.

खरंतर, मान्सून लांबणीवर पडल्यामुळे खरिपाच्या प्रेरणादेखील कोळंबल्या आहेत. अशात देशात एल निनोचा प्रभाव आहे. या प्रभावामुळे अनेक राज्यांमध्ये दुष्काळ पडण्याची शक्यता आहे. यामुळे उत्पादन कमी होऊन त्याचा मान्सूनवरही परिणाम पाहायला मिळेल, असं हवामान खात्याने आधीच सांगितलं होतं. त्यामुळे एल निनोच्या प्रभावामुळे कुठेतरी मान्सून मागे पडला असल्याचं हवामान खात्याचं म्हणणं आहे दरम्यान, पावसाने यंदा असचं रूप दाखवलं तर शेतकरी आणि एकूणच सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसू शकते.

Maharashtra Weather Forecast: राज्यात ‘या’ तारखेपासून धो-धो बरसणार पाऊस, कोकणासह ३ भागांना अलर्ट जारी

पुढच्या ३-४ दिवसांमध्ये मान्सून जोर धरेल….

भारतीय हवामानशास्त्र पुणे विभागाचे प्रमुख के. एस होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, विदर्भाच्या काही भागांमध्ये आज मान्सूनचं आगमन झालं तर पुढच्या ३-४ दिवसांमध्ये महाराष्ट्र, कर्नाटक आणि तेलंगणाच्या आणखी काही भागांमध्ये नैऋत्य मोसमी पाऊस पुढे जाण्याची परिस्थिती अनुकूल आहे. त्यामुळे पुढच्या ३-४ दिवसांमध्ये मान्सून जोर धरेल असं हवामान खात्याने म्हटलं आहे.

मान्सून कुठे आला आहे…

दरम्यान, सध्या केरळपासून मान्सूनची वाटचाल सुरू झाली होती. तो मान्सून आता कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशच्या बहुतांश भागात पोहोचला आहे. इतकंच नाहीतर महाराष्ट्रातल्या विदर्भात आणि ओडिसा, छत्तीसगडच्या काही भागांमध्ये मान्सून दाखल झाला आहे. तसेच झारखंड, बिहार आणि उत्तर प्रदेशच्या काही भागांमध्येही मान्सून पोहोचेल अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.

El Nino Effect : चक्रीवादळ, महामारी आणि भूकंपानंतर भारतावर आणखी एक मोठं संकट, सरकारची चिंता वाढली

आज कुठल्या शहरांमध्ये पावसाने लावली हजेरी…

आज मुंबईसह उपनगरांमध्ये, ठाणे, नवी मुंबई अशा महत्त्वाच्या शहरांमध्ये मान्सूनपूर्व पावसाच्या सरी बरसल्या. कल्याण-डोंबिवलीमध्येही मुसळधार पाऊस झाला. अंबरनाथमध्येदेखील पावसाला सुरुवात झाली. सकाळपासून ढगाळ वातावरण होतं. पण उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर आणि ग्रामीण भागांमध्ये पावसाने अचानक हजेरी लावल्याने नागरिकांची तारांबळ उडल्याचं पाहायला मिळालं. रत्नागिरी जिल्ह्यातही मुसळधार पाऊस झाला.

Maharashtra Monsoon: राज्यासाठी पुढचे ७२ तास अतिमहत्त्वाचे, रखडलेला मान्सून मुंबईसह ‘या’ भागांमध्ये बरसणार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed