प्रभावती घोगरेंनी विखे पाटलांच्या दहशतीचे अनेक किस्से सांगितले. विखेंना वाटायचं लोणीत परिवर्तन होऊ शकत नाही. इथले नागरिक आपल्या ताटाखालची मांजर आहे. पण ज्यावेळेस आम्ही ग्रामपंचायत आणि सोसायटी ताब्यात घेतली, तेव्हापासून आमच्या मागे हात धुवून लागले. आम्ही काय करतो? प्रत्येक ठिकाणी केसेस. आमचे काम आडवणं, सदस्यांना दमदाटी करणं, माझ्याबरोबर कोणाचा स्टेटस असेल तर त्याला बोलावून घेऊन जाब विचारणं अशी अवस्था आहे. ते पायाजवळ पाहणारे लोक आहेत. असे असून तुम्ही स्वतःला महाराष्ट्राचे नेते म्हणवता, ही कुठली प्रवृत्ती आहे तुमची. ते म्हणता मी कोणाविषयी कटुता धरत नाही. आम्हाला विचारा आमच्याविषयी काय तुमच्या मनात कटुता आहे. विखेंची हुकूमशाही थांबवायची असेल तर तुम्ही एकजूट व्हा, असा सल्लाही घोगरेंनी उपस्थितांना दिला.
आमच्या प्रवरेचा काय सांगता, आम्हालाच घर घर लागलेली आहे. आमचाच कारखाना पाहायला परदेशी कोण जिमे आलेला आहे, साऱ्या थड्यावर हात ठेवायचे, इकडे गणेश कडे ठेवायचे तिकडे राहुरीकडे ठेवायचे, सगळे आपल्याकडे आणि आपल्याच घराकडे पाहिजे. पार सरपंचपासून मंत्र्यांपर्यंत दुसरा कोणताही व्यक्तिमत्व तयार होऊ द्यायचं नाही. गावातल्या टपरीचे उद्घाटन असेल तरी हेच पाहिजे. लग्नपत्रिकेत नाव यायलाच पाहिजे. सगळ्यांचे सोयरे आहे हे. माझे सासरे शिर्डीचे पहिले आमदार चंद्रभान घोगरे. या परिसरानेच त्यांना निवडून आणले. काळ गेला. आम्ही आपलं शेती प्रपंचाकडे वाळालो. मात्र हे पन्नास वर्षांपासून सत्ता उपभोगताय, असे घोगरे म्हणाल्या.
लोणी खुर्द गावामध्ये सर्वात जास्त जमिनी प्रवरा कारखाना आणि शैक्षणिक संस्थेच्या आहेत. माझे सासरे चंद्रभान घोगरे, गाडगीळ आदी मंडळींनी प्रवरा कारखाना उभा केला. इतिहास तर असा बदलला यांनी की घरातूनच तो उभा केला आणि आम्हालाच सभासद ठेवलं नाही. प्रवरा मेडिकलला ट्रस्टकडून पाटलांनी काढला आणि आम्हाला केस पेपरच्या लाईनीत उभं केलं. याला कारणीभूत आपणच आहोत. तुम्ही महसूलमंत्री आहे ना. उसाला भाव देऊन तोंड गप करा ना आमचे, असे म्हणत सरपंच प्रभावती घोगरेंनी विखे पिता पुत्रांची कान उघाडणी केली.