• Sat. Sep 21st, 2024

‘त्या’ शिक्षकांचा घरभाडे भत्ता रद्द; पालघर जिल्हा परिषदेचा मोठा निर्णय

‘त्या’ शिक्षकांचा घरभाडे भत्ता रद्द; पालघर जिल्हा परिषदेचा मोठा निर्णय

म. टा. वृत्तसेवा, पालघर : नेमणूक झालेल्या शाळेच्या मुख्यालयी न राहताच घरभाडे लाटणाऱ्या शिक्षकांचा घरभाडे भत्ता रद्द करण्याचा निर्णय पालघर जिल्हा परिषदेने घेतला आहे. जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी याबाबतचा ठराव एकमताने मंजूर करून घेतला. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणापेक्षा आपला घराकडे अधिक लक्ष देणाऱ्या जिल्ह्यातील शिक्षकांना यामुळे चांगलाच धडा बसणार आहे.पालघर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश निकम, तसेच शिक्षण सभापती यांच्यासह सर्वच पदाधिकारी आणि सदस्यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. शिक्षकांचे शाळेत उशिरा येणे, लवकर जाणे तसेच तारीख न टाकता आदल्या दिवशी रजेचा अर्ज देऊन ठेवणे आदी मुद्द्यांवर या बैठकीत अनेक सदस्यांनी तक्रारी मांडल्या.

जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत पाणीटंचाईच्या मुद्द्यावरही सदस्यांनी प्रश्न विचारून प्रशासनाला धारेवर धरले. वीस दिवसांनी एकदा पाणीपुरवठा होत असलेल्या नंदाडे-सफाळे नळपाणीपुरवठा योजना, जलजीवन मिशनमध्ये कंत्राटदारांची मतेदारी, विक्रमगड-साखरे पाणीपुरवठ्याचे बंद झालेले काम आदी प्रश्न माजी उपाध्यक्ष व विद्यमान सदस्य शिवा सांबरे, मनीषा निमकर, विरोधी गटनेते जयेंद्र दुबळा, भावना विचारे, वैदेही वाढाण, भारती कांबडी आदींनी उपस्थित केले. त्यांच्या प्रश्नांना उत्तरे देताना प्रशासकीय अधिकाऱ्यांची भंबेरी उडाली. या सर्वसाधारण सभेला जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम, समाजकल्याण सभापती मनीषा निमकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी संघरत्न खिल्लारे तसेच विभाग प्रमुख, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
डहाणूत विद्यार्थ्यांचे शाळा बंद आंदोलन; बुलेट ट्रेनसाठी केलेलं हे काम जबाबदार, काय घडलं?
बिबळ्याला रोखण्यासाठी उपाययोजना

पालघर जिल्ह्यात बिबळ्याचा संचार वाढत असून, हल्ल्याच्या घटनाही होत आहेत. मात्र त्यावर उपाययोजना करण्याच्या दृष्टीने डहाणू वन विभागाला मुंबईतील बोरिवली येथील नॅशनल पार्क येथील अधिकाऱ्यांवर अवलंबून राहावे लागत आहे. या जिल्ह्यातील नागरिकांचे प्राण गेल्यावर वन विभाग उपाययोजना करणार का, असा प्रश्न विचारू वन विभागाच्या अधिकाऱ्यांची अधिकाऱ्यांना धारेवर धरले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed