• Sat. Sep 21st, 2024

माहिती आयोगाकडे ११ हजार प्रलंबित अपिलांचा डोंगर; पूर्णवेळ आयुक्त नसल्याने आकडा वाढला

माहिती आयोगाकडे ११ हजार प्रलंबित अपिलांचा डोंगर; पूर्णवेळ आयुक्त नसल्याने आकडा वाढला

State Information Commission : मागील अनेक महिने नाशिक विभागाला पूर्णवेळ आयुक्तच नसल्याने प्रलंबित प्रकरणांची संख्या वाढली आहे.

 

order
माहिती आयोगाकडे ११ हजार प्रलंबित
म. टा. प्रतिनिधी, नाशिक : राज्य माहिती आयोगात तक्रारींचा ओघ प्रचंड वाढला आहे. मात्र, सद्यस्थितीत खंडपीठाकडे अकरा हजार प्रकरणे प्रलंबित असल्याचे चित्र आहे.करोना काळात प्रकरणे निकाली काढण्याची प्रक्रिया काही काळ बंद होती. बराच काळ आयोगाला पूर्णवेळ आयुक्त नसल्याने प्रलंबित प्रकरणांचा आकडा वाढल आहे. राज्यात माहिती आयोगाची चार खंडपीठे आहे. त्यापैकी एक खंडपीठ नाशिकला असून, त्या अंतर्गत नाशिक, धुळे, जळगाव, अहमदनगर आणि नंदुबार जिल्ह्यांतील प्रकरणे दाखल होत असतात. गेल्या तीन वर्षांत या पाचही जिल्ह्यांतून दाखल होणाऱ्या तक्रारींची संख्या प्रचंड वाढली आहे. सद्यस्थितीला वर्षभरात द्वितीय अपील म्हणून अडीच ते तीन हजार प्रकरणे खंडपीठात दाखल होत असतात. त्यावर सुनावणी होऊन ही प्रकरणे निकाली काढली जातात. सध्या आयोगात दररोज ४० ते ६०, तर महिन्याला सुमारे ५०० प्रकरणे निकाली निघतात. मात्र, खंडपीठाकडे अपिले दाखल होण्यापासून ती निकाली निघण्यापर्यंतची प्रक्रिया बरीच किचकट असते. आयुक्तांनी दिलेल्या निकालांचे डिक्टेशन घेऊन ते टाइप करून संबंधितांना टपालाने पाठवावे लागतात व वेबसाइटवर अपलोड करावे लागते.
चुकीला माफी नाही! मृत्युदंडाच्या शिक्षेत जगभरात वाढ; सर्वाधिक आशियात, जाणून घ्या इतर देशांची स्थिती
याशिवाय दंडात्मक कारवाई, पाठपुराव्याची पत्रे, बजेट, हजेरी आदी कामेही असतात. दोन महिन्यांपूर्वी नाशिकला पूर्णवेळ आयुक्तांची नियुक्ती केलेली आहे. मात्र, त्यांच्याकडेही कोकण विभागाची प्रभारी जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे प्रकरणे निकाली काढण्याची प्रक्रिया मंदावल्याने दोन वर्षांतील प्रलंबित प्रकरणांची संख्या अकरा हजारांवर गेली आहे.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed