• Mon. Nov 25th, 2024
    नरेंद्र मोदींनी मणिपूरमध्ये जाऊन दाखवावं, उद्धव ठाकरेंचं चॅलेंज

    मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं राज्यव्यापी पदाधिकारी शिबीर मुंबईत आयोजित करण्यात आलं आहे. उद्धव ठाकरे यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला. महिलेवर अत्याचार केला म्हणून मी एकाला मंत्रिमंडळातून गेट आऊट केला होता. मात्र, ते सत्तेसाठी सत्तारांना सोबत ठेवतात, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली. आमचं हिंदुत्व हे प्रबोधनकार ठाकरे, बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेलं हिंदुत्व आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

    तुम्हाला देण्यासाठी माझ्याकडे काहीही नाही, तरिही सोबत आहात. तुमची साथ सोबत महत्त्वाची आहे. उद्या आपल्या शिवसेनेचा वर्धापन दिन परवा जागतिक गद्दारी दिन असेल. आपल्या लोकांनी केलेल्या गद्दारीला वर्ष होईल. गेल्या वर्षात जे लोक भेटत आहेत, मराठी आहेत अमराठी आहेत. हिंदू भेटत आहेत, ख्रिश्चन आहेत, मुस्लीम लोकं भेटत आहेत. ते लोकं भेटतात आणि काळजी करु नका, असं सांगतात. जे निघाले आहेत त्यांना जाऊद्यात. सुखमे साथ रहतै है उन्हे रिश्ते कहते है, जे दुखमें साथ रहते है उन्हे फरिश्ते कहते है. उद्धव ठाकरे यांनी मुंबईत बोलताना पुन्हा एकदा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा अफलजखान असा उल्लेख केला.

    आम्ही नामर्दाची औलाद नाही, सत्तेची मस्ती आहे, हा जो तुमचा फुगलेला फुगा आहे तो फोडायला वेळ लागणार नाही. एवढीच मस्ती असेल तर मणिपूरमध्ये दाखवा. ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्सचे अधिकारी मणिपूरमध्ये पाठवा, परत येतात का बघा. अमित शाह मणिपूरमध्ये जाऊन आले पण उपयोग झाला नाही. मणिपूर राज्य पेटलेलं असून तुम्ही अमेरिकेत निघाला आहात. रशिया आणि यूक्रेन युद्ध थांबवल्याची भाकडकथा सांगतात. ते कथा खरी करायची असेल तर मणिपूरमध्ये जाऊन दाखवा.
    Indonesia Open: सात्विक अन् चिरागने रचला इतिहास, वर्ल्ड चॅम्पियनला पाणी पाजणारी पहिली भारतीय जोडी

    अयोध्या पौळवर शाईफेक झाली, शिंदे या महिलेला मारहाण झाली. आता महिला गुंड तयार झाल्या आहेत. या पुढं अन्याय करणाऱ्यांना शिवसैनिक काय असतं ते दाखवून द्या, असं उद्धव ठाकरे म्हणाले. तुम्ही हात उचलू नका कुणी हात उचलला तर हात वेगळा करा, असा आदेश उद्धव ठाकरेंनी दिला. गद्दारांच्या फौजेचं नेतृत्त्व करण्यापेक्षा मूठभर निष्ठावतांचं नेतृत्त्व करणं कधीही मान्य करेन, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

    २३ जूनला आम्ही पाटण्याला जाणार आहे. नितीशकुमार मातोश्रीवर आले होते. भाजपसोडून सगळे मातोश्रीवर येतात. विरोधी पक्षांची एकजूट नाही तर स्वातंत्र्यप्रेमींची एकजूट, देशप्रेमींची एकजूट आहे. जे देशावर प्रेम करतात त्यांनी आमच्या सोबत यावं, असं उद्धव ठाकरे म्हणाले. सावरकरांनी हाल अपेष्ठा भोगल्या होत्या त्या मोदी आणि फडणवीसांसाठी भोगल्या नव्हत्या, असं उद्धव ठाकरे म्हणाले. भाजपसोडून दुसरे पक्ष एकत्र येतोय ते लोकशाही आणि स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी एकत्र येतोय, असं उद्धव ठाकरे म्हणाले. देवेंद्र फडणवीस यांची स्थिती सांगता येत नाही आणि सहनही होत नाही अशी झाल्याची टीका उद्धव ठाकरेंनी केली.

    Ashish Deshmukh:आशिष देशमुखांची भाजपमध्ये घरवापसी, कमळ हाती घेताच लोकसभा विधानसभा निवडणुकीबाबत मोठं वक्तव्य

    अदानीवरुन प्रश्न विचारला की तुमची बोबडी वळते, तुम्हाला प्रश्न विचारला की राहुल गांधींना घराबाहेर काढता, संसदेतून बाहेर काढता, असं उद्धव ठाकरे म्हणाले. ३७० कलम काढताना शिवसेनेनं पाठिंबा दिलेला हे अमित शाहांनी बातम्या काढून बघाव्यात. ३७० कलम काढून इतकी वर्ष झाली जम्मू काश्मीरमध्ये अजून निवडणुका का घेत नाहीत, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.
    जागतिक खोके दिन ते सेनेचा वर्धापन दिन, आदित्य ठाकरेंचा जाहिरात नाट्यावरुन फडणवीसांना टोला, म्हणाले..

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed