• Sat. Sep 21st, 2024

संजय मंडलिकांची भाजपशी जवळीक; सतेज पाटील स्पष्टच म्हणाले, ”आमचं ठरलंय’ हा इतिहास झाला’

संजय मंडलिकांची भाजपशी जवळीक; सतेज पाटील स्पष्टच म्हणाले, ”आमचं ठरलंय’ हा इतिहास झाला’

कोल्हापूर: लोकसभा जागेसाठी कोल्हापूरमधील दोनपैकी एक जागा लढवावी, अशी भूमिका काँग्रेसने सुद्धा घेतलीय. मात्र, महाविकास आघाडीत सध्या मतदार संघ आपल्याकडे घेण्यासाठी तिन्ही पक्षांची रस्सीखेच जरी सुरू असली तरी तिन्ही पक्षाचे प्रमुख नेते एकत्र बसल्यानंतर जो काही एक निर्णय होईल त्याला अन्य दोन्ही पक्ष सहमत असतील. मात्र, लोकसभा निवडणुका या महाविकास आघाडी म्हणून लढणार असल्याचे आमदार सतेज पाटील यांनी म्हटले आहे. तसेच कोल्हापूर लोकसभा मतदार संघाचे विद्यमान खासदार संजय मंडलिक हे शिंदे गटात गेल्याने आणि आता भाजपमधून निवडणूक लढणार असल्याच्या चर्चेबाबत हे मत व्यक्त केला असून ‘आमचं ठरलंय’ हा इतिहास झाला. आता त्यावर बोलून उपयोग नाही भविष्याकडे पाहिलं पाहिजे असे ते म्हणाले आहेत.

आमचं ठरलंय हा इतिहास झाला आता त्यावर बोलून उपयोग नाही: सतेज पाटील

२०१९ च्या लोकसभा निवडणुकांनंतर गेल्या चार वर्षात राज्याचे राजकारण पूर्णपणे बदलले आहे. शिवसेनेमध्ये झालेल्या बंडामुळे भाजप आणि शिवसेना शिंदे गट युटी विरुद्ध काँग्रेस ,राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरे सेना मिळून महविकास आघाडी अशी लढत होत आहे. युती काळामध्ये कोल्हापूर लोकसभेची जागा शिवसेनेकडे असल्याने येथील दोन्ही विद्यमान खासदार हे ठाकरेना सोडून शिंदे सोबत गेले आणि आता दोघांनाही पराभूत करण्यासाठी महाविकास आघाडी म्हणून एकतर लढणार आहेत. तर खासदार संजय मंडलिक हे भाजपच्या चिन्हावरून लढणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या असून यांना निवडून आणण्यात मोलाचा वाटा उचलणाऱ्या सतेज पाटील यांनी देखील आपल मत व्यक्त केले असून संजय मंडलिक मला विविध कार्यक्रमांमध्ये भेटतात. मात्र त्या ठिकाणी कुठलीही राजकीय चर्चा नाही अथवा निवडणुकी संदर्भात कुठलीही चर्चा झालेली नाही. आमचं ठरलंय हा इतिहास झाला. आता त्यावर बोलून उपयोग नाही भविष्याकडे पाहिलं पाहिजे, असं म्हणत संजय मंडलिक यांच्यासाठी महाविकास आघाडीची दारं जवळपास बंद केली आहेत.

कोल्हापुरात नव्या राजकारणाची आखणी, शिंदेंचा खासदार भाजपच्या तिकीटावर लढणार? धनंजय महाडिकांनी सांगितला प्लॅन

काँग्रेसदेखील दोनपैकी एक जागा लढवण्यासाठी इच्छूक

आगामी लोकसभा निवडणुकांसाठी महाविकास आघाडी एकत्र लढणार असून याबाबत अद्याप चर्चा सुरू आहेत. कोल्हापूरच्या जागेसाठी महाविकास आघाडी मधील सर्वच पक्ष इच्छुक असून काँग्रेस देखील दोन पैकी एक जागा लढवण्यासाठी इच्छुक आहे. मात्र, या निवडणुका नेमक्या कधी होतील हे अद्याप अस्पष्ट असून चार राज्यातल्या विधानसभा सोबत लोकसभा घ्यायची का अशी सध्या चर्चा सुरू आहे. हे चित्र स्पष्ट होण्यास अजून महिना तरी लागेल आणि यानंतर आम्ही आमची भूमिका स्पष्ट करू असे सतेज पाटील म्हणाले आहेत. तसेच ज्यांना जे वाटणीला येईल तसे पुढे निर्णय होतील असे ते यावेळी म्हणाले आहेत.

राजू शेट्टी यांच्याशी प्राथमिक चर्चा

हातकणंगले लोकसभा निवडणुकीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांच्याशी प्राथमिक चर्चा करण्यात आली असून याबाबत अद्याप ठोस चर्चा झाली नाही. मात्र येथील परिस्थिती पाहता तिन्ही पक्ष मिळून काहीतरी ठोस निर्णय घेतील असेही सतेज पाटील यावेळी म्हणाले आहेत.

सतेज पाटलांना बंटी म्हणणं बंद करा; अजित पवारांचे मजेशीर षटकार , उपस्थितांमध्ये एकच हशा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed