• Sat. Sep 21st, 2024
युतीच्या घोषणेनंतर वादाची ठिणगी पडली, लोकसभेच्या जागांवरुन दावे प्रतिदावे सुरु

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : ग्रामपंचायतीपासून खासदारकीपर्यंतच्या निवडणुका शिवसेना-भाजप एकत्रच लढणार असल्याचे एकीकडे युतीचे शीर्षस्थ नेते सांगत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे नेते मात्र लोकसभेच्या जागावाटपात आम्हाला गृहीत धरू नका, असा इशारा देत आहेत. मागील लोकसभा निवडणुकीत आम्ही जिंकलेल्या १८ पैकी एकही जागा भाजपला सोडणार नसल्याचे सांगत त्यांनी थेट आव्हान दिले आहे.

राज्यातील आगामी काळातील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना जोरदार वेग आला आहे. अशावेळी युतीचे नेते आगामी सर्व निवडणुकांमध्ये आम्ही युती म्हणून लढणार असल्याचे सांगत असताना शिंदे यांच्या शिवसेनेचे काही मंत्री जागांवर हटून बसले आहेत. भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी धाराशिव येथे भाजपचा खासदार होईल, असे अलिकडेच वक्तव्य केले होते. त्यावर शिवसेनेचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी २०२४ची धाराशिव लोकसभा जागा शिवसेनाच लढवणार असल्याचे स्पष्ट केले आहे. ‘ज्या जागा शिवसेनेने जिंकलेल्या आहेत, त्या आम्हीच लढविणार असून आम्हाला कुणीही गृहीत धरू नये’, असा थेट इशाराच त्यांनी भाजपला दिला. ‘आम्ही जिकूंन आलेल्या १८ पैकी एकही जागा भाजपला सोडणार नाही. कारण आमचा गट वेगळा आहे आणि आमचे अस्तित्वही वेगळे आहे. आम्ही शिवसेना आहोत, पारंपरिक जागा आमच्याकडे आहेत’, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
रायगडावर आज ‘शिवराज्याभिषेक दिन’ सोहळ्याचा समारोप, जय्यत तयारी, १०९ ठिकाणी CCTV कॅमेरे
‘युतीमधील नेतेमंडळी आपापल्या जागांवर अशाप्रकारे हटून बसली असल्याने आगामी काळात शिवसेना-भाजप युती म्हणून एकत्रच लढणार की त्यांच्यात शेवटच्या क्षणी कुस्ती होणार’, असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे.

एकाच वेळी ६ जण गेल्याने कुटुंबप्रमुख धाय मोकलून रडला; म्हणाला, कुणा-कुणाला खांदा देऊ आणि…

भाजपसोबत निवडणूक लढणार एकनाथ शिंदेंची माहिती

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत अमित शाह यांची भेट घेतल्यानंतर मोठी घोषणा केली होती. आम्ही आगामी लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका भाजपसोबत लढवणार असल्याचं शिंदे यांनी जाहीर केलं होतं. सेनेचे खासदार गजानन कीर्तीकर यांनी २२ जागा लढवणार असल्याचं म्हटल्यानंतर तानाजी सावंत यांनी जिंकलेली एकही जागा सोडणार नसल्याचं म्हटलं आहे.
Odisha Accident: त्या मार्गावर पहिली ट्रेन धावली, अपघाताचं दृश्य पाहून प्रवासी ‘जगन्नाथ, जगन्नाथ’ पुटपुटत राहिले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed