• Mon. Nov 25th, 2024

    Nashik News : पैशांसह एटीएम पळविण्याचा प्रयत्न फसला; पोलिसांनी पाठलाग करून चोरट्यांना घेतले ताब्यात

    Nashik News : पैशांसह एटीएम पळविण्याचा प्रयत्न फसला; पोलिसांनी पाठलाग करून चोरट्यांना घेतले ताब्यात

    Atm Theft News : नोटांनी भरलेले एटीएम पळवून नेण्याचा चोरट्यांच्या टोळीचा प्रयत्न पोलिसांच्या सतर्कतेमुळे प्रयत्न फसल्याची घटना निफाड मधील लासलगाव-विंचूर रोडवर घडली आहे.

     

    पैशांसह एटीएम पळविण्याचा प्रयत्न फसला; पोलिसांनी पाठलाग करून चोरट्यांना घेतले ताब्यात
    म. टा. वृत्तसेवा, निफाड : लासलगाव-विंचूर रोडवरील अॅक्सिस बँकेचे नोटांनी भरलेले एटीएम पळवून नेण्याचा चोरट्यांच्या टोळीचा प्रयत्न पोलिसांच्या तत्काळ अॅक्शनमुळे फसला. पोलिसांनी पाठलाग सुरू केल्यामुळे चोरट्यांनी रस्त्यातच एटीएम फेकून पळ काढला.लासलगाव-विंचूर रोडवर अॅक्सिस बँकेची शाखा असून, त्यालगतच एटीएम केंद्र आहे. रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी एटीएम त्यातील १५ लाख रुपयांसह सोबत आणलेल्या कारमध्ये (एमएच १५, एझेड ०५७) टाकून पळवून नेण्याचा प्रयत्न केला. ही घटना एटीएमच्या सीसीटीव्ही कॅमेरात चित्रीत होण्यासह अॅक्सिस बँकेच्या मुख्य प्रशासकीय कार्यालयातही त्याचा अलार्म गेला. तेथील अधिकाऱ्यांनी लासलगाव पोलिस ठाण्यात माहिती दिली. त्यानुसार लासलगाव पोलिस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पुढे पोलिसांनी तातडीने नाकाबंदी केली व जलद तपास सुरू केला. पोलिस नाईक योगेश शिंदे, सुजित बारगळ यांनी एका खासगी वाहनाद्वारे या चोरट्यांचा पाठलाग सुरू केला. ही बाब लक्षात येताच चोरट्यांनी हे यंत्र औरंगाबाद रोडवरील बोकडदरे शिवारात पोलिसांच्या खासगी वाहनाच्या दिशेने फेकून देत पळ काढला.

    Odisha Accident: त्या मार्गावर पहिली ट्रेन धावली, अपघाताचं दृश्य पाहून प्रवासी ‘जगन्नाथ, जगन्नाथ’ पुटपुटत राहिले
    एटीएमसह अंदाजे १५ लाख रुपये रोख रक्कम पोलिसांनी ताब्यात घेतली. पोलिसांच्या सतर्कतेमुळे चोरीचा प्रयत्न फसला. लासलगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक राहुल वाघ, पोलिस कर्मचारी प्रदीप अजगे, कैलास महाजन, नंदकुमार देवडे, हवालदार देवा पानसरे, होमगार्ड पगारे घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणी लासलगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अतिरिक्त पोलिस अधीक्षक माधुरी कांगणे यांनीही घटनास्थळी भेट देत पाहणी केली.

    जवळच्या शहरातील बातम्या

    Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed