• Sat. Sep 21st, 2024

पत्नीचा जाच नकोसा, वटपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला पत्नीपिडीत पुरुषांच्या पिंपळाला प्रदक्षिणा

पत्नीचा जाच नकोसा, वटपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला पत्नीपिडीत पुरुषांच्या पिंपळाला प्रदक्षिणा

छत्रपती संभाजीनगर: हाच पती सात जन्म हाच पती मिळो, यासाठी महिला वटसावित्री पौर्णिमा साजरी करून वर्षानुवर्षांपासून वटवृक्षाची पूजा करतात व आख्यायिकेप्रमाणे वटवृक्षास सात फेरे मारून सात जन्म हाच पती मिळावा यासाठी पूजाअर्चा करतात. परंतु दुर्दैवाची गोष्ट की ज्या पुरुषांच्या बायका त्यांच्याशी भांडतात , त्यांच्यावर केसेस करतात व त्यांचे ह्याच जन्मी जगणे अशक्य केले व आता परत वटसावित्री पौर्णिमा साजरी करून त्यांना आणखी सात जन्म त्यांच्या ताब्यात घेण्याची मागणी करतात. अशा भांडखोर पत्नीसोबत पिडीत पती राहू शकत नाही म्हणून पत्नी पिडीत पुरुष आश्रम करोडी छ. संभाजी नगर येथे मागील पाच वर्षांपासून पिंपळ पौर्णिमा साजरी करून पिंपळाला साकडे घालत आले आहेत व आजदेखील साकडे घालून पिंपळ पौर्णिमा साजरी केली . यावेळी संस्थेचे अध्यक्ष एड.भारत फुलारे ,उपाध्यक्ष सुरेश फुलारे ,सचिव चरणसिंग गुसिंगे,सोमनाथ मनाळ ,एकनाथ राठोड,भाऊसाहेब साळुंके ,प्रवीण कांबळे, भिक्कन चंदन ,श्रीराम तांगडे ,संजय भांड, एड.अमोल घुगे .एड अमोल होनमाने ,तसेच इतर मोठ्या संखेने उपस्थित होते.

Vat Purnima 2023: उद्या वटपौर्णिमा; जाणून घेऊया तिथी, मुहूर्त, आणि महत्व

दिवसेंदिवस पुरुषांवरील अन्याय अत्याचारात वाढ होत चालली आहे. महिला अबला होत्या त्यावेळी महिलांच्या सबलीकरणासाठी वेगवेगळे कायदे करण्यात आले. परंतु सदर कायदे बनवताना पुरुषांवर अन्याय होऊन पुरुष अबला होतील याचा विचारच न केल्याने आज खऱ्या अर्थाने पुरुष हतबल होऊन ,पुरुष अबला झाला आहे . त्यामुळे पुरुष सबलीकरण करण्यासाठी एकतर्फी कायदे रद्द होऊन पुरुषांना देखील कायद्याचे संरक्षण मिळणे गरजेचे आहे. एक पुरुष ज्या वेळेस लग्न करतो तो फार मोठ्या अशा उराशी बाळगतो व मोठ्या उत्सुकतेने लग्न करतो परंतु त्याला हे माहित नसते की,त्याच्या स्वप्नाचे लग्न होताच तुकडे तुकडे होणार आहे . हुतांश बायका ह्या लग्न होताच पतीचा तिटकारा करायला सुरुवात करतात व या ना त्या कारणावरून पती सोबत भांडण तंटा करतात. आज काल बहुतांश बायका ह्या आपल्या पतीचा केवळ बुजगावण्यागत वापर करतात. केवळ लग्नाचा शिक्का मारला की नंतर त्यांना नवरा नावाला परंतु त्यांची संपत्ती पैसा हेच पाहिजे असते, अशी भावना पिडीत पुरुष आश्रमातील सदस्यांनी बोलून दाखवली.

Vat Purnima 2023: अशी करा वटपौर्णिमेची संपूर्ण तयारी; जाणून घ्या पूजा साहित्य आणि पूजा विधी

पत्नी केवळ आपल्या पतीवरच केस दाखल करत नाही तर, त्याच्या संपूर्ण कुटुंबावर केसेसचा मारा करून सर्व कुटुंब उद्ध्वस्त करते. अशावेळी पती हतबल होतो. तो पोलिसात तसेच न्यायालयात दाद मागण्यास जातो तेव्हा त्यास दाद मिळत नाही. पोलीस मदत करत नाही व पोलिसात मदत मिळाली नाही तर तो मोठ्या आशेने न्यायालयात धाव घेतो परंतु न्यायालयात देखील पिडीतांच्या पदरात निराशा पडते. एकदा की पत्नीला आपल्या पतीकडून पोटगी मिळण्यास सुरुवात झाली की जन्मभर त्याची तिच्या तावडीतून सुटका होत नाही. पत्नी आपल्या पतीवर एक नाही तर अनेक जसे ४९८ अ ,डोमेस्टिक व्हायलन्स ,सी आर पी सी १२५ ,३०७ आय पी सी अश्या अनेक केसेसचा मारा करते . अशावेळी त्यांच्यावर केसेसचा भडिमार झाल्यास तो आयुष्यातून उद्ध्वस्त होतो व अखेर जेल मध्ये जातो. नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरो ( N.C.R.B.) च्या नुसार आपण बघितले तर जवळ जवळ ७८ टक्के विवाहित पुरुष आत्महत्या करताना दिसत आहे त्याच्या तुलनेत केवळ २२ ते २३ टक्के महिला आहे ,महिलांचे प्रमाण कमी आहे ही बाब वाखाणण्या लायक आहे. अशीच पुरुषांच्या बाबतीत देखील व्हावे व पुरुषांना देखील न्याय मिळावा, अशी मागणी या पुरुषांनी केली.

पत्नी पीडितांच्या प्रमुख मागण्या

* पुरुषांसाठी स्वतंत्र पुरुष आयोग बनवावा
* एकतर्फी कायद्यावर बंदी आणावी
* प्रत्येक पोलीस ठाण्यात पुरुष दक्षता समिती स्थापन करावी .
* जिल्हा स्तरावर पुरुष तक्रार निवारण केंद्र देखील स्थापन करावे .
* कौटुंबिक वाद माननीय न्यायालयात गेल्यास एका वर्षाच्या आत निकाली काढावे.

अशा बहुतांश मागण्या आहेत. परंतु कुणी ऐकून घ्यायला तयार नाही, म्हणून या पिंपळास साकडे घालून आश्रमाच्या वतीने पिंपळाची मनोभावे पूजा करून त्यांच्याकडे पीडितांचे गार्‍हाणे मांडले, ‘’की आता देव तरी आमचे म्हणणे ऐकेल’’ व या दुष्ट बायकांच्या तावडीतून पत्नी पीडितांची सुटका करेल. यासाठी आज पत्नी पिडीत पुरुष आश्रमात पिंपळ पौर्णिमा साजरी करण्यात आली .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed